Breaking News
Home / बॉलिवूड / प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीचं ग्रँड वेडिंग होणार या ठिकाणी.. होणारा नवरा आहे
hansika motwani wedding
hansika motwani wedding

प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीचं ग्रँड वेडिंग होणार या ठिकाणी.. होणारा नवरा आहे

शका लका बुम बुम मधील बालकलाकार ते तमिळ, तेलगू चित्रपट अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या हंसिका मोटवानीच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. हंसिका मोटवानी ही लवकरच विवाहबद्ध होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. तिचे लग्न मोठ्या दिमाखात पार पडणार असे बोलले जात आहे. या ग्रँड वेडिंगसाठी तिने खास ठिकाणाची देखील निवड केली आहे. राजेशाही थाटात पार पडणारे हे लग्न ४५० वर्षे जुन्या असलेल्या राजस्थानमधील मुंडोता किल्ल्यावर होणार आहे. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी किल्ल्यावर स्थित असलेल्या हॉटेलच्या रुम देखील बुक करण्यात आल्या आहेत.

hansika motwani wedding
hansika motwani wedding

डिसेंबर महिन्यात मुंबईतील प्रसिद्ध बिजनेसमन सोबत ती लग्नगाठ बांधणार असल्याचे सांगितले जाते. नक्की कोणासोबत लग्न करणार आहे, हे तिने मुद्दाम गुलदस्त्यात ठेवले आहे. तो लकी बॉय कोण आहे याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अर्थात तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावाचा उलगडा ती योग्य वेळी करणार असल्याचे ती म्हणते. बॉलिवूड सृष्टीतील बरीचशी कलाकार मंडळी डेस्टिनेशन वेडिंगला पसंती दर्शवतात. हंसिकाने देखील लग्नासाठी हाच पर्याय निवडलेला आहे. क्यूँकी सांस भी कभी बहु थी, सोन परी, करिष्मा का करिष्मा या हिंदी मालिकांमधून तिने चांगली प्रसिद्धी मिळवली होती. कोई मिल गया, आबरा का डाबरा मधुन नावारूपाला आलेल्या हंसिकाची जादु पुढे कमी पडली.

hansika motwani wedding look
hansika motwani wedding look

हिमेश रेशमिया सोबत आपका सुरुर मध्ये ती नायिका म्हणून झळकली होती. त्यामानाने या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. परंतु बॉलिवूड चित्रपट सृष्टीत तिला फारसे यश मिळाले नाही. म्हणून तिने आपली पाऊलं दाक्षिणात्य चित्रपटाकडे वळवली. हॉरर, रोमँटिक, सस्पेन्स, थ्रिलर अशा टॉलीवूड चित्रपटात हंसिका चांगलीच रुळलेली पाहायला मिळाली. हंसिकाची आई मोना मोटवानी ही स्किन स्पेशालिस्ट आहे. सेटवर मेकअप करण्यापासून संपूर्ण चेहऱ्याची काळजी तिची आई तिच्या घेत होती. त्याचमुळे तिला चेहऱ्याच्या सर्जरीची कधीही गरज भासली नाही, असे ती कायम  म्हणते.

तिच्या खाजगी आयुष्यबाबत बोलायचं झालं तर हंसिका सिंधी कुटुंबात जन्मली आहे मात्र आता तिने बौद्ध धर्म स्वीकारला आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, “माझ्या मते प्रभावीपणे तणावमुक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे,’नाम म्योहो रेंगे क्यो’ हा जप करणे. मी बौद्ध धर्माचे कठोरपणे पालन करते.” अभिनेत्री हंसिकाच्या मते तिला या जपाने वैयक्तिक आयुष्यात तसेच व्यावसायिकदृष्ट्या देखील मोठी मदत मिळाली आहे. तूर्तास हंसिका आपल्या लग्नाच्या तयारीला लागली आहे. त्यामुळे लग्नातला तिचा गेटअप कसा असेल याची प्रतीक्षा चाहत्यांना आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.