Breaking News
Home / मराठी तडका / पूजा सावंत नाही तर या खास व्यक्तीच्या प्रेमात आहे भूषण प्रधान
pooja sawant bhushan pradhan
pooja sawant bhushan pradhan

पूजा सावंत नाही तर या खास व्यक्तीच्या प्रेमात आहे भूषण प्रधान

भूषण प्रधान हा मराठी सृष्टीतील हँडसम अभिनेता म्हणून ओळखला जातो. मोस्ट स्टायलिश हिरोच्या यादीत त्याने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. चित्रपट, मालिका तसेच नाटक आणि वेबसिरीज अशा चारही क्षेत्रात त्याने काम केले आहे. घे भरारी, कुंकू, ओळख, पिंजरा, जय भवानी जय शिवाजी अशा मालिकांसोबतच त्याने सतरंगी रे, आम्ही दोघी, कॉफी आणि बरंच काही, पारंबी, टाईमपास २, निवडुंग, गुलमोहोर या चित्रपटातून तो कधी नायक तर कधी सहाय्यक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. जय भवानी जय शिवाजी या मालिकेतून भूषणला छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याची नामी संधी मिळाली. मात्र मालिकेला प्रेक्षकांनी अल्पसा प्रतिसाद दिल्याने ही मालिका आटोपती घेण्यात आली होती.

pooja sawant bhushan pradhan
pooja sawant bhushan pradhan

चित्रपटात एकत्रित काम करत असताना त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले होते. अगदी संस्कृती बालगुडे, पूजा सावंत, भाग्यश्री लिमये यांच्यासोबत तो बऱ्याचवेळा स्पॉट झालेला पाहायला मिळाला. पूजा सावंत, भूषण प्रधान आणि वैभव तत्ववादी यांची मैत्री अनेकांना माहीत आहे. मात्र पूजा सावंत सोबत तो रिलेशनशिपमध्ये असावा असे अनेकदा बोलले जात होते. मात्र आता या चर्चांना कुठेतरी ब्रेक लागलेला पाहायला मिळतो आहे. कारण भूषणने प्रथमच त्याच्या गर्लफ्रेंड सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून हा खुलासा केला आहे. भूषण प्रधान ज्या मुलीला डेट करत आहे तिचे नाव आहे वैशाली महाजन. वैशाली महाजन आणि भूषण प्रधान एका फोटोमध्ये एकत्रित पाहायला मिळाले आहेत.

bhushan pradhan vaishali mahajan
bhushan pradhan vaishali mahajan

या फोटोंवर मराठी विश्वातील सेलिब्रिटींनी देखील दोघांना शुभेच्छा देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भूषणची गर्लफ्रेंड वैशाली ही देखील कलाक्षेत्रात कार्यरत आहे. रचना संसद कॉलेजमधून वैशालीने फाईन आर्टसचे शिक्षण घेतले. गेल्या ५ वर्षांपासून ती आर्ट डायरेक्टर म्हणून जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहे. याच माध्यमातून भूषण आणि वैशालीशी ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. वैशालीने अनेकदा भूषण सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळतात. त्यामुळे भूषण ऑफिशियली वैशालीसोबत एंगेज झाला असून त्याचे नाव आता इतर अभिनेत्रींसोबत जोडले जाणार नाही याची त्याने काळजी घेतली आहे. त्यामुळे आता भूषण आणि वैशाली हे दोघे लग्न कधी करणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.