Breaking News
Home / जरा हटके / शिव आणि तुझं काय चाललंय?.. चाहत्याच्या प्रश्नावर विणाने असे उत्तर दिले की पुन्हा
veena jagtap shiv thakare
veena jagtap shiv thakare

शिव आणि तुझं काय चाललंय?.. चाहत्याच्या प्रश्नावर विणाने असे उत्तर दिले की पुन्हा

बिग बॉसचा शो हा असा शो आहे जिथे प्रेमप्रकरण गाजली जातात. हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये तर असे स्पर्धकच प्रेक्षकांची मने जिंकून विजेते झाली आहेत असे म्हणायला हरकत नाही. मग मराठी बिग बॉसचा शो याला अपवाद कसा ठरेल. या शोचा दुसरा सिजन शिव ठाकरेने जिंकला होता. बिग बॉसच्या घरात असताना विणा जगताप आणि शिव ठाकरे यांच्यात सूर जुळून आले होते. बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडल्यानंतरही हे दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. शिवच्या गावी गेल्यावर विणाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. एवढेच नाही तर विणाने तिच्या हातावर शिवच्या नावाचा टॅट्यु देखील गोंदवून घेतला होता.

veena jagtap shiv thakare
veena jagtap shiv thakare

त्यामुळे हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र अवघ्या काही महिन्यातच या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. विणाने तिच्या हातावर गोंदवलेला शिवच्या नावाचा टॅट्यु मिटवला त्यावरून या दोघांमध्ये ब्रेकअप झाले असे स्पष्ट झाले होते. ब्रेकअपनंतर हे दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. शिव ठाकरे म्युजिक व्हिडीओ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला, तर विणा जगताप मालिकांमधून सक्रिय आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून विणाला पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. अशातच विणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. ‘Ask me a question’ याअंतर्गत तिला तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रश्न विचारले.

gorgeous veena jagtap
gorgeous veena jagtap

त्यातील प्रश्नांना विणाने चोख उत्तरं दिलेले पाहायला मिळाली. अशातच विणाला एका चाहत्याने ‘तूमचं काय चाललंय शिव दादाच न तुझं?’ असा एक प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नावर विणाने मात्र सडेतोड उत्तर देताना म्हटले आहे की, ‘First and last माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणालाही उत्तरं द्यायला मी बांधील नाही. नैतिकता बाळगा आणि इतरांना श्वास घेऊ द्या. मी कधी आलेय आणि तुम्हाला विचारलंय की, आपका क्या चल रहा है या क्या नहीं चल रहा, कारण मी नेहमीच माझ्या स्वतःच्या कामात लक्ष्य देते. विणाच्या या सणसणीत उत्तराने मात्र तिच्या चाहत्याला चांगलीच चपराक बसली आहे त्यामुळे इथून पुढे तरी विणाला असे प्रश्न विचारले जाणार नाहीत असा चोख बंदोबस्त या उत्तराने केला आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.