नमस्कार,
मित्रहो कलाकार जेव्हा भूमिकेत असतो तेव्हा त्यानुसार त्याचा पोशाख देखील असतो, त्यामुळे त्याची भूमिका आणि अभिनय खूप खुलून दिसतो. लोक त्याच्याकडे सहज आकर्षित होतात, त्याच्या अभिनयाला पोशाखामुळे एक विशिष्ट ओळख मिळते. कोणतीही भूमिका कमी किंवा जास्त दर्जाची नसते, त्यातील कलाकाराचा अभिनय खूप महत्वाचा असतो त्यामुळे त्याची भूमिका जरी मुख्य नसली तरीही ती प्रचंड गाजते. छोट्या पडद्यावर अनेक मनोरंजक मालिका असतात, रसिक त्या मालिका वेळात वेळ काढून आवडीने पाहतात. यातील कलाकार दररोज प्रेक्षकांच्या भेटीस येतात त्यामुळे प्रेक्षकांसोबत त्यांचे खूप घट्ट नाते निर्माण होते.
हल्ली मराठी वाहिनीवर देखील अनेक रंजक मालिका प्रदर्शित होत आहेत, त्यामध्ये नवनवीन कलाकारांची ओळख होत आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे गौरी किरण, ही अभिनेत्री अनेक मालिकेतून रसिकांच्या भेटीस आली आहे. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर गौरीचे भरपूर चाहते आहेत, ती नेहमी काही ना काही इंटरेस्टिंग पोस्ट शेअर करत असते. हल्ली तीने भिकारीच्या लुक मधील आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, तिच्या लुकला पाहून अनेक जण आश्चर्यचकित आहेत.
गौरीच्या या भिकारीच्या वेशांतरामागे तीचा नवा चित्रपट ब्लँकेट चे कारण आहे, या चित्रपटासाठी गौरी ने हा लुक केला आहे. या चित्रपटात गौरी एक मानसिक संतुलन ढासळलेली भिकारी आहे, या भूमिकेसाठी तीला खरोखरच्या कचरा डेपोत रहावे लागणार आहे. तिथेच झोपणे, तिथेच खाणे करावे लागेल असे दिग्दर्शक राज गोरडे यांनी सांगितले होते. पण अशी भूमिका असतानाही गौरीने मागे न हटायचे असा निर्णय घेतला आहे. एक कलाकार म्हणून गौरीने ही भूमिका देखील साकारण्यासाठी होकार दिला आहे. गौरीने आजवर स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत सोयराबाई ची भूमिका साकारली होती, तसेच ‘पुष्पक विमान’ या चित्रपटात तीने सुबोध भावे सोबत महत्वाची भूमिका निभावली होती. ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम पदार्पण’ हा पुरस्कार तिला मिळाला आहे.
सुंदरा मनामध्ये भरली, सिंधू, स्पेशल ५, बोलते तारे या व अशा अनेक मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रत्येक भूमिकेतील तीचा अभिनय चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. सोयराबाई च्या भूमिकेसाठी तीला अनेकजण पसंत करू लागले आहेत. तीचा आवाज, सौंदर्य हे चाहत्यांना खूप आवडते. गौरी ने सर्व बाजूने विचार करून भिकारीची भूमिका साकारण्यासाठी होकार दिला आहे. या चित्रपटात काम करताना तीला २ वेळा इन्फेक्शन झाले होते, हा गेटअप करण्यासाठी तीने कितीतरी दिवस नख साफ केली न्हवती. विस्कटकेली विग घालताना अनेक वेळा तीचे केस तुटले आहेत. पण तरीही ती अगदी आत्मीयतेने ही भूमिका निभावत आहे. ब्लॅंकेट या चित्रपटात बाकी कलाकारांच्या भूमिका सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. ब्लॅंकेट चित्रपट स्त्री भ्रूण हत्येवर आधारित असून, तिच्यावर होणाऱ्या अमानवी अत्याचारांवर अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. स्त्री ही नेहमी आपल्या करिअर बाबत जागृत असते, पण तीला वात्सल्य देखील हवे असते.
आई कधीच लिंग भेद करत नाही, समाजातील रूढ गोष्टी बाबत ती आपले विचार मनात ठेवते पण तरीही प्रत्येक वेळी तिचाच बळी दिला जातो. सर्व गोष्टीसाठी तीला कारणीभूत ठरवले जाते. काहीशी अशीच परिस्थिती या चित्रपटात दाखवली आहे, गौरीला चित्रपट आणि उज्जवल भविष्यासाठी kalakar.info टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा. गौरी ची भूमिका कशी वाटते ते नक्की सांगा तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, जर हा लेख आवडला तर लाईक आणि शेअर न विसरता करा.