Breaking News
Home / ठळक बातम्या / प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक राजू फुलकर यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन..
director raju phulkar
director raju phulkar

प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक राजू फुलकर यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन..

​​गाढवाचं लग्न हे हरिभाऊ वडगावकर यांनी लिहिलेल​ ​प्रसिद्ध वगनाट्य​,​​​ या नाट्यास भारतीय केंद्रशासनाचा राष्ट्रपती पुरस्कार ​देखील मिळाला, पुढे २००६ मध्ये सुमित मुव्हीजची निर्मिती असलेला चित्रपट राजू फुलकर यांनी दिग्दर्शनाची धुरा लीलया पेलली.. मकरंद अनासपुरे, राजश्री लांडगे, संजय खापरे, नंदू पोळ, सिध्देश्वर झाडबुके, अन्वय बेंद्रे, समिरा गुजर​ आणि सोनाली कुलकर्णी​ ​अशा दिग्गज कलाकारांनी यात अप्रतिम अभिनय केला.

director raju phulkar
director raju phulkar

दिग्दर्शक​ ​राजू फुलकर ​यांनी ​गाढवांचं लग्न, आई एकविरेचा उधो उधो , कलम ३०२, अभियान, निष्कलंक, आभरान, हसतील त्याचे दात दिसतील अशा ​​विविध चित्रपटांसाठी ​लेखक, दिग्दर्श​न, स्टोरी रायटिंग, आणि कला​, संगीत दिग्दर्श​न देखील केले आहे. ​त्यांना चित्रपट उद्योगातील त्याच्या अद्भुत योगदानासाठी ​झी गौरव, ​झी टॉकीज, व्ही शांताराम पुरस्कार​ या सारखे ​​अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत सकाळ, पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक आणि इतर अनेक स्पर्धांसाठी ज्युरी​ म्हणून देखील त्यांनी काम पहिले आहे. त्यांनी ​​संत नामदेव, संत जनाबाई​ सारखे ​संत महात्म्य​ अशा​​ ​​​अनेक चित्रपट, नाट​​क आणि मालिका दिग्दर्शित केल्या आहेत​. ​४० हुन अधिक नाटक आणि एकांकिका नाटकांसाठी ​लेखन देखील केले आहे. ​​

raju phulkar film academy opening
raju phulkar film academy opening

​आयुष्यातील सुमारे चार दशके ​​विविध पैलूं​द्वारे मराठी ​चित्रपट आणि नाट्यसृष्टीला योगदान देणाऱ्या श्री.राजू फुलकर​ यांनी ​राजू फुलकर फिल्म अकादमी RPFA नावाची संस्था देखील सुरु केली होती, चित्रपट उद्योगात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या सर्व ​स्तरातील गुणवंत कलाकारां​ना घडविण्याचे मोलाचे योगदान त्यांनी दिले.​ पुणे, मुंबई, तुळजापूर, नागपूर, गडचिरोली अशा वेगवेगळ्या ठिकाणांवर​​ मराठी आणि हिंदी भाषेतील​ अनेक विद्यार्थ्यांना ​घडवले. ​भारती हॉस्पिटल मध्ये किडनी​च्या ​आजारावर उपचार घेत ​असताना काल संध्याकाळी ​​त्यांची प्राणज्योत ​माळवली. मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीला मोलाचे योगदान देणाऱ्या अष्टपैलू दिग्दर्शकाला भावपूर्ण श्रद्धांजली.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.