Breaking News
Home / बॉलिवूड / चारही मुली जन्मल्या म्हणून नाराजी होती पण आत्ता याच मुली करत आहेत बॉलिवूडवर राज्य…
shakti mohan 4 bollywood sisters
shakti mohan 4 bollywood sisters

चारही मुली जन्मल्या म्हणून नाराजी होती पण आत्ता याच मुली करत आहेत बॉलिवूडवर राज्य…

चारही मुली जन्मल्या म्हणून नाराज झाली होती बॉलिवूड मधील ही सुप्रसिद्ध जोडी, आत्ता याच मुली करत आहेत बॉलिवूडवर राज्य, नाव ऐकून थक्क व्हाल…

आपल्याकडे एक अशी म्हण म्हंटली जाते ती खूपच प्रचलित आहे आणि ती म्हणजे, “पहिली बेटी धनाची पेटी”. पण, अजूनही आपल्याला आपल्या आजूबाजला खूप मोठ्या प्रमाणात आशे लोक सापडतील ज्यांना मुलगी नकोच आहे, अशे अनेक लोक आहेत ज्यांना मुलगाच हवा असतो कारण तो त्यांच्या वंशाचा दिवा असतो. अनेकदा मुलगी होणार आहे म्हंटल्यावर तिला नाकारणारे खूप लोक या समाजात पाहायला मिळतात. जग दाखवण्यापूर्वीच तिचा गर्भातच जीव घेण्यात येतो.

किंवा मग मुलगाच हवा ह्या हट्टा पोटी मुलीचा देखील सासरी खूप छळ करण्यात येतो. मुलगा झाला नाहीतर… अस म्हणून मुलीला खूप त्रास दिला जातो. गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला ह्या सारखे असे अनेक प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतील. सरकार ने गेल्या काही वर्षांन पासून मुलीच्या संरक्षणासाठी अनेक कायदे बनवले आहेत आणि ह्या बाबत कठोर पावले देखील उचलण्याची सुरुवात केली आहे.

पण आजकाल आपल्याला पालकान मध्ये ही जन-जागृती पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुलगी असो किंवा मुलगा असा ह्यातला भेद न करता आता मुलगीला देखील बरोबरीचा दर्जा मिळालेला पाहायला मिळत आहे. बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये सुद्धा असेच एक कुटुंब आहे ज्यांना त्यांचा वंशाचा दिवा म्हणजे मुलगा हवा होता पण नशिबाने त्यांच्या पोटी एका पाठोपाठ एक ४ मुलींनी जन्म घेतला आणि ह्या मुळे ही जोडी खूपच नाराज झाली. त्यांचा पदरात एक नाही दोन नाही तर चार मुली असल्याने हे कुटुंब अत्यंत नाराज झाल होत. आम्ही सांगत असलेल्या जोडीचे नाव मिस्टर अँड मिसेस शर्मा आहे. ब्रिजमोहन शर्मा ह्यांना चारही मुलीच झाल्या. पण, ह्याच चार मुली आज बॉलिवूड इंडस्ट्री वर राज्य करत आहेत. तर कोण आहेत ह्या चार मुली हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

beautiful 4 sisters
beautiful 4 sisters

नीती मोहन: नीती मोहन ही ह्या चार बहिणींनमध्ये सर्वात मोठी आणि पहिली मुलगी असून ती एक उत्कृष्ठ गायिका सुद्धा आहे. ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’, ह्या चित्रपटात तिने ‘इश्क वाला लव’, हे गाण अतिशय उत्कृष्ट गायल होत आणि ते लोकांना प्रचंड आवडल देखील होत. हे गाण एवढ हिट झाल होत की, २-३ आठवडे ते मीडियावर ट्रेंडिंगला होत. ती आजची आघाडीची गायिका म्हणून बॉलिवूड मध्ये राज्य करत आहे.

शक्ती मोहन: शक्ती मोहन ही ह्या चार बहिणीनपैकी दोन नंबरची बहिण आहे. शक्ती देखील मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकून बॉलिवूड मध्ये काम करत आली आहे. ती बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. तिने डान्स इंडिया डान्स मध्ये देखील काम केले आहे. तसेच तिच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आले आहेत. सध्याच्या आगामी काळात म्हणजेच लॉकडाऊन मुळे ती सध्या घरीच असते तरी सुद्धा तिच्याकडे अनेक प्रो-जेक्ट असल्याची माहिती समोर येत आहे.

neeti shakti mukti kirti mohan
neeti shakti mukti kirti mohan

मुक्ती मोहन: मुक्ती मोहन ही ह्या चार बहिणीनपैकी तीन नंबरची बहिण आहे. मुक्ती मोहन देखील तिच्या मोठ्या बहिणीनप्रमाणे बॉलीवूड मध्ये आपली जागा बसवत असून ती मोठ्या बहिणी प्रमाणेच डान्सिंग क्लास घेत आहे. एक कोरिओग्राफर म्हणून देखील तिने अनेक चित्रपटानंसाठी काम केल आहे आणि अनेक शोज मध्ये सुद्धा ती काम करत असल्याचे समजते.

कीर्ती मोहन: कीर्ती मोहन ही ह्या चार बहिणीनंपैकी चौथी आणि शेवटची बहिण आहे. कीर्ती सुद्धा तिच्या तिन्ही मोठ्या बहिणीनं प्रमाणे बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये काम करत आहेत. ती एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असूनही तीने बॉलिवूड क्षेत्रांमध्ये मोठे नाव कमावले आहे. तसेच ह्या सध्याच्या आगामी काळात म्हणजेच लॉकडाऊन मध्ये देखील मोठे प्रोजेक्ट तिच्या हातात आहे असे तिने सांगितले.

shakti mohan beautiful trio
shakti mohan beautiful trio

तर ह्याच त्या मिस्टर अँड मिसेस शर्माच्या चार मुली. आताच काही दिवसांपूर्वी ब्रिजमोहन शर्मा ह्यांनी एका मुलाखतीत असे सांगितल होते की त्यांना आधी चारही मुलीच असल्याचे खूप दुःख वाटत होते पण आता ह्या परिस्थितीत सुधा त्या चारही मुली खूप काम करत असून त्यांनी खूप नाव ही कमावली आहेत. आणि ह्याच मुळे मला त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि त्यांना मुलगा नसल्याचं त्यांच्या मनात थोडी देखील खंत नाही असे सुद्धा ब्रिजमोहान शर्माने सांगितले.

sweet family of shakti mohan
sweet family of shakti mohan

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.