मित्रहो कलाकार हा पडद्यावर जेव्हा येतो तेव्हा अनेकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या जातात. आपली कला सादर करण्यात पारंगत असणारा कलाकार प्रेक्षकांच्या मनात सहज उतरतो. मग त्यावेळी त्याची भूमिका कोणतीही असो त्या भूमिकेला जेव्हा तो आत्मीयतेने सादर करतो तेव्हा आपोआप रसिकांचे लक्ष वेधून घेतले जाते. चित्रपट सृष्टीत असे भरपूर कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने एक विशेष ओळख मिळवली आहे. लोक त्यांना अभिनयातून जास्त ओळखतात, नायकाच्या भूमिका तर नेहमीच गाजतात पण अभिनय क्षेत्रातील काही खलनायक देखील खूप प्रसिद्ध झाले आहेत. अनेकांच्या खलनायकाच्या भूमिका अजरामर झाल्या आहेत. अशा काही प्रसिद्ध खलनायकांपैकी एका खलनायकाची आज आपण माहिती घेणार आहोत.
हल्ली चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार विलनच्या रुपात दिसतात त्यापैकी आशिष विद्यार्थी हे एक प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय आहेत, तसेच त्यातील त्यांचा अभिनय सुद्धा खूप कौतुकास्पद आहे. आशिष यांच्या बद्दल तर आपण जाणतोच पण त्यांच्या कुटुंबाबद्दल त्यांनी कधीच जास्त माहिती सांगितली नाही त्यामुळे त्यांच्या पत्नीविषयी खूप जणांना माहिती नाही. त्यांची पत्नी ही बंगाली चित्रपट इंडस्ट्री मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तीने अनेक बंगाली चित्रपटात काम केले आहे. आशिष यांच्या पत्नीचे नाव राजोशी बरूआ असून ती सुप्रसिद्ध अभिनेत्री शकुंतला बरूआ यांची मुलगी आहे. ‘सुहानी सी एक लडकी’, या हिंदी मालिकेतील त्यांची भूमिका भरपूर गाजली आहे. आशिष आणि राजोशी यांना एक मुलगा देखील असून त्याचे नाव अर्थ आहे. आशिष यांचा जन्म केरळमध्ये झाला होता, त्यांच्या आई एक प्रसिद्ध , कथक नर्तिका होत्या. त्यांना अभिनयाची आवड आधीपासूनच होती, कॉलेजमध्ये असताना त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. तसेच नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये त्यांनी प्रवेश घेऊन अभिनयात स्वतःला उत्कृष्ट बनवले.
‘सरकार’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, या चित्रपटाचे चित्रीकरण आधी होऊनही त्यांचा ‘द्रोहकाल’ हा चित्रपट प्रथम प्रदर्शित झाला आहे. द्रोहकाल या चित्रपटातील त्यांची भूमिका भरपूर गाजली, पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अनेक चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या असून त्यांना त्या भुमिकेबद्दल प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांचा खलनायकाच्या वेशातील अभिनय खूप प्रसिद्ध होत गेला. इस रात की सुबह, १९४२ अ लव्ह स्टोरी, जीत, जिद्दी या व अशा अनेक चित्रपटातील त्यांचा अभिनय खूप गाजला, त्यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यांनी अल्ट बालाजीच्या मिशन ओव्हर मार्स या वेबसरीज मध्ये काम केले होते. त्यांच्या आजवरच्या सर्वच भूमिका प्रसिद्ध झाल्या आहेत आणि लोकप्रिय देखील झाल्या आहेत. त्यांच्या आजवरच्या यशामध्ये आणखीन भर पडून त्यांची अशीच प्रगती होवो ही सदिच्छा. मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा.