झी मराठी वाहिनी गेल्या काही दिवसांपासून आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच या वाहिनीने जाऊ बाई गावात हा रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. सुरुवातीला हा शो नेमका काय आहे हे अनेकांना समजले नव्हते. मात्र आता त्या शोच्या स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देऊन त्यांना गुण दिले जात आहेत. नुकतेच या स्पर्धकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून दिले आहे. त्यामुळे रिऍलिटी शो बिग बॉसची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे. तर ह्याच जोडीला आता चिमुकल्या मुलांसाठी वाहिनीने नवीन शो दाखल केला आहे.

चला हवा येऊ द्या या शोला पुन्हा एकदा झी वाहिनीने संधी दिली आहे. अगोदर हा शो बंद होईल असे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर आठवडाभर हा शो प्रसारित केला जात आहे. याच अनुषंगाने ड्रामा Juniors हा शो चला हवा येऊ द्या च्या वेळेत प्रसारित केला जाणार आहे. आठवड्याचे तीन दिवस हे दोन्ही शो प्रेक्षकांच्या भेटीला येतील असे सांगितले जात आहे. दरम्यान या नवीन रिऍलिटी शोमध्ये छोट्या मुलाचे अतरंगी टॅलेंट पाहायला मिळणार आहे. ज्या स्पर्धकांना या शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी आपल्या अतरंगी टॅलेंटचे व्हिडीओ ओडिशनमध्ये दाखवायचे आहेत. या शोचे ऑडीशन लवकरच सुरू होणार आहेत. तुमच्या जवळच्या शहरात होणाऱ्या या ओडिशनमध्ये अशा अतरंगी मुलांचे टॅलेंट तुम्हाला दाखवायचे आहे.

ऑडिशन द्यायला येणाऱ्या हजारो स्पर्धकांमधून काही खास मुलांचीच निवड करण्यात येणार आहे. तेव्हा तुम्हीही या ऑडिशनच्या तयारीला लागा आणि झी मराठी वाहिनीवरून प्रसिद्धीच्या झोतात या. ड्रामा Juniors हा रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पण लहान मुलाचे टॅलेंट दाखवसाठी झी मराठी वाहिनी काहीतरी नवीन घेऊन येतंय हे पाहून प्रेक्षकांनी या शोचे स्वागतच केलेले आहे. झी मराठी वाहिनी लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळवून देत आहे. हे एक नवीन व्यासपीठ उपलब्ध झाल्याने या शोमध्ये सहभागी होण्यासाठी नवोदित बालकलाकार उत्साही आहेत. त्यामुळे हे ऑडिशन कधी सुरू होतंय याचीच ही चिमुरडी वाट पाहून आहेत.
ty