मराठी चित्रपट सृष्टीला जसे चांगले दिवस आले आहेत तसेच चांगले दिवस मालिका सृष्टीला देखील अनुभवायला मिळत आहेत. केवळ एक दोन मालिकेत काम करून ही कलाकार मंडळी आता महिन्याला चांगले मानधन मिळवून आपले आयुष्य सुखकर करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मराठी सृष्टीतील छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी गाडी घेण्याचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. असाच एक सुखाचा क्षण देवमाणूस मालिकेतील अभिनेत्रीने देखील अनुभवलेला पाहायला मिळतो आहे. देवमाणूस या मालिकेतील डिंपल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने नुकतीच गाडी खरेदी केली. न्यू फॅमिली मेम्बर असे म्हणत आपल्या नव्या कोऱ्या गाडी खरेदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या आनंदाच्या क्षणी चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. अस्मिताने किया कॅरेन्स या वाहनाची खरेदी केली आहे. या गाडीची किंमत १० लाख ते १५ लाखांपर्यंत आहे. त्यामुळे अस्मिता आपल्या मालिकेतून खूप चांगले मानधन मिळवत असल्याचे दिसून येते. देवमाणूस या मालिकेच्या लोकप्रियतेनंतर अस्मिताने देवमाणूस २ या मालिकेत काम केले. मालिकेतून काम करत असतानाच ती काही म्युजिक व्हिडिओ सॉंग मध्ये झळकली होती. अस्मिताचे संपूर्ण शिक्षण पुण्यातूनच झाले. लहानपणापासून अस्मिता सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्यायची. पुढे कॉलेजमध्ये असताना नाटकातून अभिनयाची संधी मिळत गेली. यातूनच तिला काही गाण्यातून झळकण्याची संधी मिळाली.

देवमाणूस ही तिने अभिनित केलेली पहिली टीव्ही मालिका ठरली. मालिकेतील डिंपल आणि टोण्याची नोकझोक सुपरहिट झाली होती. डिंपल डॉक्टरला मदत करते मात्र या बदल्यात आपले घर चालावे आणि हिरोईन बनता यावे म्हणून ती त्याच्याकडून मोबदला देखील घेताना दिसते. आता देवमाणूस २ यात डॉक्टर आणि डिंपलचे पैशांसाठीच लग्न केलेले असते. मालिकेत चिनुच्या मृत्यू मागे डॉक्टरचा हात तर नाही ना अशी पुसटशी शंका तिला आली आहे. परंतु डॅशिंग जामकरच्या तावडीत हे दोघेही लवकरच अडकणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार की आणखी काही ट्विस्ट पाहायला मिळणार हे लवकरच उलगडेल. तूर्तास अस्मिताने खरेदी केलेल्या पहिल्या वहिल्या गाडीनिमित्त तिचे अभिनंदन.