Breaking News
Home / मालिका / ​सानिकाच्या चुकीमुळे दिपूचा होणार गंभीर अपघात..

​सानिकाच्या चुकीमुळे दिपूचा होणार गंभीर अपघात..

मन उडू उडू झालं या मालिकेत सानिका प्रेग्नंन्ट असल्याचे नाटक करत आहे. परंतु हे नाटक आता लवकरच तिच्या अंगलट आलेले पाहायला मिळणार आहे. मालिकेतला हा ट्विस्ट एका धक्कादायक वळणावर येऊन ठेपलेला पाहायला मिळतो आहे. कारण सानिका इंद्रा आणि दिपूच्या प्रेम प्रकरणामुळे अगोदरच संशयाच्या नजरेने तिच्याकडे पाहत असते. अशातच देशपांडे सरांच्या घरी पूजेसाठी साळगावकर कुटुंब दाखल होते तिथेच सानिका प्रेग्नंन्ट असल्याने तिची चोरओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. मात्र सानिका प्रेग्नेंट नाही हे दिपूला डॉक्टरांकडून समजते.

man udu udu jhala hruta durgule
man udu udu jhala hruta durgule

आता आपलं भांडं फुटलं आपल्याला घरचे ओरडणार म्हणून सानिका घरातील सर्वांवर ओरडते. रागाच्या भरात तडकाफडकी ती देशपांडेचं घर डोडून कार्तिकबरोबर घरी निघून येते. तिच्या पाठोपाठ दिपू तिची समजूत घालायला येते. मात्र दिपू तिथे आल्याने सानिका तिच्यावर खुप चिडते तू माझ्या घरी का आलीस असे म्हणत ती दिपूला दारातून बाहेर ढकलते. रस्त्यावर असलेल्या एका दगडामुळे दिपूचा तोल जातो आणि ती रस्त्यावर पडते. मात्र नेमक्या अशाच वेळी एक भरधाव गाडी दिपूला येऊन धडक मारते. या अपघातात दिपूला गंभीर दुखापत झालेली असते. दिपूला अपघात झाल्याचे पाहून सानिका गोंधळून जाते.

man udu udu jhala family
man udu udu jhala family

या घटनेमुळे सानिकाला दिपूच्या प्रेमाची जाणीव होणार की नाही हे येत्या काही भागातच स्पष्ट होईल. तूर्तास मन उडू उडू झालं या मालिकेचा नवा प्रोमो धक्कादायक वळण देणारा ठरणार आहे. दिपूच्या अपघातामुळे इंद्रा आणि दिपूच्या नात्यात जवळीक वाढणार असली तरी सानिका मात्र तिच्यापासून दुरावणार का हे येत्या भागात पाहायला मिळणार आहे. तूर्तास हृता दुर्गुळेने मालिकेतून ब्रेक घेतला असल्याने हा ट्विस्ट आणण्यात आला आहे. पर्वा १८ मे रोजी हृताचा प्रतीक शाह सोबत मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. त्यामुळे आता काही दिवस मालिकेतून ब्रेक मिळवण्यासाठी हे ट्विस्ट आणलेले पाहायला मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वी हृता ही मालिका सोडणार असे बोलले जात होते. मात्र मी ही मालिका सोडणार नाही असे तिने मीडियाशी बोलताना म्हटले होते. त्यामुळे हृताच्या मालिकेत परत येण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तिच्या जागी दुसरी कोणती अभिनेत्री आल्यास ही मालिका प्रेक्षकांच्या नाराजीला नक्कीच सामोरी जाणार. मात्र यामागचे नेमके कारण काय आहे हे लवकरच उघड होईल. कारण काहीही असले तरी हृता या मालिकेत पुन्हा यावी अशीच प्रेक्षकांची ईच्छा आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.