Breaking News
Home / मालिका / ​कुशलची नक्कल पाहून अंशुमनच्या ३ वर्षांच्या मुलीचा हजरजबाबीपणा.. सगळ्यांना करतोय लोटपोट

​कुशलची नक्कल पाहून अंशुमनच्या ३ वर्षांच्या मुलीचा हजरजबाबीपणा.. सगळ्यांना करतोय लोटपोट

चला हवा येऊ द्या या शोने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून कुशल बद्रिके अनेक कलाकारांची नक्कल करताना पाहायला मिळाला आहे. सुनील शेट्टी, अनिल कपूर सारख्या कलाकारांची तो नेहमीच नक्कल करताना दिसतो. सोमवारच्या भागात चला हवा येऊ द्याच्या मंचावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या नव विवाहित दाम्पत्यांनी हजेरी लावली आहे. सोबतच हार्दिक जोशी, अक्षया देवधर, अंशुमन विचारे, त्याची पत्नी पल्लवी आणि त्याची तीन वर्षांची मुलगी अन्वी विचारे हे या मंचावर उपस्थित राहणार आहेत. यावेळी चला हवा येऊ द्या च्या टीमने राजा हिंदुस्तानी या चित्रपटातील स्क्रीट सादर केलेले पहायला मिळणार आहे.

anvi anshuman vichare kushal badrike
anvi anshuman vichare kushal badrike

कुशल बद्रिके यावेळी जॉनी लिव्हरने साकारलेली भूमिका निभावली आहे. मात्र हा जॉनी लिव्हर साकारताना तो ऋषिकेश जोशीची नक्कल करताना पाहायला मिळतो आहे. त्यावर श्रेया बुगडे कुशलच्या स्कीट्सची खिल्ली उडवताना दिसते. तुला जॉनी लिव्हर जमला नाही असे म्हणत मंचावरील सर्वांनीच कुशलची मापं काढण्यास सुरुवात केली. अशातच अंशुमनच्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलीने ‘आला आला’ असे म्हणत उपस्थितांना लोटपोट करून सोडले. ही एवढूशी चिमुरडी कुशलला तुला जॉनी लिव्हर जमलाय असे सूचित करताच कुशल बद्रिकेला देखील आपले हसू आवरले नाही. गेल्या सात वर्षात माझ्यासोबत असं काही घडलं नव्हतं मात्र ह्या स्किटमुळे माझी मापं काढली गेली.

akshaya hardik shivani virajas
akshaya hardik shivani virajas

त्यात अन्वीनेही हात धुवून घेतल्याने आता मला तोंड दाखवायला जागा उरली नाही असे म्हणत कुशल स्वताही आनंद लुटतो. अंशुमन विचारे हा मराठी सृष्टीतील विनोदी कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक विनोदी शोमधून सहभागी होऊन प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. अंशुमनची मुलगी अन्वी विचारे ही सोशल मीडिया स्टार आहे. युट्युबवर तिच्या नावाने एक चॅनल आहे त्यावर तिचे अनेक मजेशीर व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. तिच्या या व्हिडीओंना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. अशातच तिला चला हवा येऊ द्या च्या सेटवर येण्याची संधी मिळाली आहे. त्यात तिचा हा निरागसपणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. तिची ही धमालमस्ती पाहण्यास प्रेक्षकही उत्सुक आहेत.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.