Breaking News
Home / जरा हटके / ‘तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावसं वाटलं?’ अभिनेत्रीची आपल्या आईबद्दल भावुक पोस्ट
devaki actress minaxi rathod with mother
devaki actress minaxi rathod with mother

‘तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावसं वाटलं?’ अभिनेत्रीची आपल्या आईबद्दल भावुक पोस्ट

काही दिवसांपूर्वी घडलेलं कीर्ती मोटे हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. किर्तीने प्रेमविवाह केला म्हणून तिच्या आईने आणि भावाने तिच्याविरोधात मोठं पाऊल उचललं होतं. ही धक्कादायक घटना पाहून अनेकांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे. अशातच अनेक कलाकारांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय मालिकेतील देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिची पोस्ट याच पार्श्वभूमीवर आहे त्यामुळे तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

devaki actress minaxi rathod with mother
devaki actress minaxi rathod with mother

मीनाक्षी राठोड हिने अभिनेता कैलास वाघमारे सोबत लग्न केलं आहे. आपल्या दोन्ही बहिणींनी देखील इंटरकास्ट मॅरेज केलं आहे, पण यावर माझ्या आईने कधीच नाराजी दाखवली नाही. आपल्या पोस्टमध्ये ती नेमकं काय म्हणाली ते पाहुयात.. आई, मोठ्या ताईचं intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय, किती राग आला असेल न तुला ताईचा. माझं कैलाश सोबत intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळ जवळ तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा! पण कायम उसाचे पाचड अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली! काल परवा आपल्या लहान मुलीचं ही inter caste लग्नं मोठ्या थाटात लावून दिलंस. आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जण रीत आहे हे सांगून दिले! हे स्वीकारायचं बीज तुला कुठे गवसलं?

minaxi sister with her husband
minaxi sister with her husband

आपल्याला ५ मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस ! राग कसा ग control केलास? ते ही पप्पा नसतांना, तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावस वाटलं? हे असच “कीर्ती थोरे” च्या आईला का नाई वाटलं, एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठे पाई? तिने तर जातितच लग्न केले होते. तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला. पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं या पेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्या सारखी आई कीर्तीला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही! या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्विकाराचंं बियाणं सापडूदे आई! काल परवाच सकारात्म वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली पोस्ट,आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे.

minaxi sisters and family
minaxi sisters and family

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.