Breaking News
Home / मराठी तडका / मराठी सृष्टीतील हे दाम्पत्य बनले आई बाबा… चलो मेरे शेर की माँ म्हणत दिली आनंदाची बातमी
ruchi savarn ankit mohan cute couple
ruchi savarn ankit mohan cute couple

मराठी सृष्टीतील हे दाम्पत्य बनले आई बाबा… चलो मेरे शेर की माँ म्हणत दिली आनंदाची बातमी

​मन फकिरा, फत्तेशीकस्त या चित्रपटातील अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी रुची सवर्ण नुकतेच आई बाबा झाले आहेत. ७ डिसेंबर रोजी त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. ‘चलो मेरे शेर की माँ’ असे कॅप्शन देऊन अंकीतने बाळासोबतचा फोटो शेअर केला आहे. पावनखिंड आणि हवाहवाई हे त्याचे प्रमुख भूमिका असलेले आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत​.​ त्यामुळे अंकीतचा आनंद आता बाळाच्या आगमनाने आणखीनच द्विगुणित झालेला पाहायला मिळतो आहे.

ankit mohan blessed with baby boy
ankit mohan blessed with baby boy

मला एक जिम पार्टनर मिळाला असेही त्याने आपल्या मुलाबद्दल बोलले होते. अंकित आणि रुची सवर्ण यांना पुत्ररत्न प्राप्तीबद्दल अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अंकित हा सुरुवातीला बॉलिवूड चित्रपट तसेच हिंफी मालिकेतून झळकला होता. नागीण ३, कुम कुम भाग्य, घर आजा परदेसी, शोभा सोमनाथ की या हिंदी मालिका गाजवल्यानंतर त्याची पाऊले मराठी सृष्टीकडे वळली. मन फकिरा, फत्तेशीकस्त या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत दिसला. अंकित आपल्या फिटनेसची काळजी घेतला दिसतो त्याची शरीरयष्टी पाहून​ मराठी चित्रपट सृष्टीतला बाहुबली म्हणून त्याला एक ओळख मिळाली आहे. अंकीतची पत्नी रुची सवर्ण ही देखील हिंदी मराठी मालिका अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.​ ​घर आजा परदेसी, कुमकूम भाग्य या मालिकेत अंकित आणि रुची एकत्रित झळकले होते.

actor ankit mohan body building
actor ankit mohan body building

रुचीने सख्या रे या मराठी मालिकेत मुख्य भूमिका निभावली होती. फत्तेशिकस्त, दिया और बाती हम, कुंडली भाग्य या मालिका, चित्रपटातून ती झळकली आहे. मालिकेत एकत्रीत काम करत असताना रुची अंकीतच्या प्रेमात पडली. २०१५ साली या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अंकित आता मराठी सृष्टीत​ चांगली प्रसिद्धी मिळवत आहे. पावनखिंड तसेच हवाहवाई या आगामी चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकित आणि रुची या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्ती​​बद्दल खूप खूप शुभेच्छा!

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.