Breaking News
Home / बॉलिवूड / बॉलिवूड मधील या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मुलीचं हिंदी सृष्टीत पाऊल
actress avantika dassani
actress avantika dassani

बॉलिवूड मधील या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मुलीचं हिंदी सृष्टीत पाऊल

बॉलिवूड सृष्टीत आजवर अनेक मराठी कलाकारांनी मुख्य भूमिकेसाठी वर्चस्व गाजवलं आहे. पद्मिनी कोल्हापुरे, उर्मिला मातोंडकर, अश्विनी भावे, माधुरी दीक्षित, किमी काटकर, ललिता पवार, सुलोचनादीदी, नंदा, भाग्यश्री अशी कितीतरी नावे ह्या यादीमध्ये घेता येतील. मैने प्यार किया या पहिल्याच चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेली भाग्यश्री आता तिच्या पुढच्या पिढीलाही बॉलिवूड सृष्टीत उतरवू पाहत आहे. भाग्यश्री पटवर्धन दसानी हिचा लेक अभिमन्यू दसानी याने मर्द को दर्द नहीं होता या चित्रपटातून नायक म्हणून बॉलिवूड सृष्टीत पहिले पाऊल टाकले होते. आँख मिचोली हा त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. याअगोदर दम मारो दम आणि नौटंकी साला या चित्रपटातून त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

actress avantika dassani
actress avantika dassani

आपल्या मुलाप्रमाणेच  भाग्यश्रीची लेक देखील आता हिंदी सृष्टीत पदार्पणास सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. ‘मिथ्या’ या वेबसिरीजमधून भाग्यश्रीची लेक अवंतिका दसानी महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या वेबसीरिजमध्ये अवंतिकासोबत हुमा कुरेशी, रजित कपूर, समीर सोनी, इंद्रनील सेनगुप्ता हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिथ्या ही रोहन सिप्पी यांची सायकॉलॉजीकल थ्रिलर ड्रामा सिरीज आहे. त्यामुळे अवंतिकासाठी ही संधी खूप महत्वाची ठरणार आहे. भाग्यश्रीने अमोल पालेकर यांच्या कच्ची धूप या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. मैने प्यार किया हा तीने साकारलेला पहिला हिंदी चित्रपट ठरला होता. या एकाच चित्रपटामुळे भाग्यश्रीला अमाप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यागी, घर आया मेरा परदेसी असे हिंदी चित्रपट केले.

bhagyashri daughter avantika
bhagyashri daughter avantika

तसेच मुंबई आमचीच, झक मारली बायको केली हे मराठी चित्रपट तीने साकारले. मात्र मैने प्यार किया या चित्रपटा इतके फारसे यश तिला पुढे मिळाले नाही. मराठीसोबतच भाग्यश्रीने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही पाऊल टाकले होते. भाग्यश्री ही महाराष्ट्रातील पटवर्धन राजघराण्यातील मुलगी आहे. विजयसिंगराव माधवराव पटवर्धन हे तिचे वडील सांगलीच्या राजघराण्यातील राजे म्हणून ओळखले जातात. भाग्यश्री, पूर्णिमा आणि मधूवंती ही त्यांची तीन अपत्ये. त्यापैकी भाग्यश्रीने चंदेरी दुनियेत पाऊल ठेवत स्वताची ओळख निर्माण केली. प्रसिद्धी मिळण्या अगोदर भाग्यश्रीचा विवाह हिमालय दसानीसोबत झाला होता. भाग्यश्रीची दोन्ही मुलं आता हिंदी सृष्टीत स्वताची ओळख बनवू पाहत आहेत. अवंतिकाच्या पहिल्या वहिल्या वेब सिरीजसाठी खूप खूप शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.