मराठी बिग बॉसच्या घरात आज नॉमिनेशन टास्क खेळला जाणार आहे. ह्या टास्कमध्ये घरातील सदस्यांना ज्यांना नॉमीनेट करायचं आहे त्या सदस्याचे पुस्तक उचलायचे आहे. बिग बॉसच्या लायब्रीरीत एका टेबलवर सदस्यांची नावे असलेली पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. त्यातील एक पुस्तक उचलून त्यावर ज्या स्पर्धकाचे नाव असेल तो डायरेक्ट नॉमीनेट होणार आहे. त्यामुळे कोण कोणते स्पर्धक ह्या आठवड्यात नॉमीनेट होणार हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. ह्या टास्कमध्ये मात्र सोनालीला कुठलेच पुस्तक उचलता आलेले नाही असेच चित्र शोच्या प्रोमोत पाहायला मिळाले आहे.

बिग बॉसच्या घरात आता एकूण आठ स्पर्धक राहिले आहेत. कालच्या भागात दादूसने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतलेली पाहायला मिळाली. ७० दिवसांचा त्यांचा हा प्रवास दादूसने खूप एन्जॉय केला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. बिग बॉसच्या घरात मी ७० दिवस राहिलो, त्यात दिले जाणारे टास्क मी मनापासून खेळले आहेत आणि हा शो मला खूप आवडला आहे. आता बाहेर निघाल्यावर देखील मी हा शो नक्की पाहणार आहे असं मत दादूसने व्यक्त केलं आहे. डायबेटीस असतानाही एका टास्क दरम्यान दादूसने मीठ खाल्ले होते त्यावेळी हा टास्क पूर्ण खेळून झाल्यावर त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. एक गायक म्हणून दादूसची लोकप्रियता असली तरी बिग बॉसने दिलेले वेगवेगळे टास्क खूप चांगले खेळले होते. जय कॅप्टन बनावा म्हणून त्यांनी डोक्यावरचे केस देखील कापले होते. सुरुवातीपासूनच ए टीमला त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ यांच्याशी त्यांची गट्टी जमली होती. स्नेहा वाघ जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर पडली तेव्हा दादूस खूप नाराज झाले होते. स्नेहा पाठोपाठ दादूस देखील घराबाहेर पडले आहेत.

बिग बॉसच्या शोने मला खूप काही दिलं आहे असे ते म्हणतात. बिग बॉसच्या घरात सोनाली आणि विशाल यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे. एकमेकांसोबत होणारे वाद आणि बिग बॉसच्या चावडीवर उडालेले खटके यामुळे सोनाली विशाल वेगवेगळे झाले आहेत मात्र सोनाली आता विशालची समजूत घालून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. या दोघात झालेले वाद कमी होतील का आणखी वाढतील हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास त्यांच्यातील गैरसमज दूर व्हावेत म्हणून विकास आणि मीनल प्रयत्न करताना दिसत आहेत. मीनल आणि विकास सोनालीला विशाल सोबत बोल म्हणून समजावून सांगत आहेत. विकासच्या आणि मिनलच्या म्हणण्यानुसार सोनाली पॅचअप करणार का हे आजच्या भागात पाहायला मिळेल.
