झी मराठी वाहिनीवर १२ फेब्रुवारी पासून दोन नव्या मालिकांची एन्ट्री करण्यात आली. संध्याकाळी ७.३० वाजता पारू ही बहुचर्चित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणि पण शिवा या मालिकेचे तांत्रिक कारणामुळे प्रसारण होऊ शकले नाही. त्यामुळे आज मंगळवारी शिवा मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान पारू या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा बडेजावपणा पाहायला मिळाला. तर निखळ निरागस गावाकडून आलेल्या पारूची त्यांच्या आलिशान बंगल्यात एन्ट्री झाली. मालिकेच्या पहिल्याच भागात नायकाची दमदार एंट्रीही पाहायला मिळाली.
सोबतच अभिनेते भरत जाधव यांनाही एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहता आले. मालिकेच्या सुरुवातीलाच आदित्य किर्लोस्करची एन्ट्री होते. आणि नेत्याच्या भूमिकेत असलेल्या भरत जाधव यांच्याशी त्याची डील फायनल होत असते. भरत जाधव ही डील फायनल करायची का असं आदित्यला विचारतात तेव्हा त्यांची ही डील धुडकावून लावतो. आईला ज्या गोष्टी मान्य नाहीत त्या मी करणार नाही असे म्हणत तो भरत जाधव यांना नकार देतो. अर्थात त्यानंतर किर्लोस्कर बंगल्यात ईडीची धाड पडते. पण आपले सर्व व्यवहार कायदेशीर असल्याने अहिल्यादेवी निश्चिंत झालेल्या असतात. कुठल्याही चुकीच्या मार्गाने पैसा मिळवायचा नाही हे त्यांच्या यशाचं सूत्र मालिकेतून पाहायला मिळालं. पण त्याच बाजूला पारुच्या एंट्रीने त्या भडकलेल्या पाहायला मिळाल्या.
आता पारू अहिल्यादेवीचं मन जिंकू शकणार का हे मालिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भरत जाधव यांनी चित्रपटात काम करण्यासोबतच मालिकेतूनही काम केलेलं आहे. सुखी माणसाचा सदरा या मालिकेनंतर आता ते झी मराठीच्या पारू मालिकेत एका नेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळाले. पण ही भूमिका तेवढ्यापुरतीच मर्यादित होती की पुढेही त्यांना या मालिकेत पाहायला मिळणार हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास भरत जाधव यांची ही सरप्राईज एन्ट्री पाहून प्रेक्षकही खुश झालेले पाहायला मिळाले. पारू आणि शिवा या मालिकेच्या प्रमोशनसाठी झी मराठी वाहिनीने चांगलाच खर्च केलेला पाहायला मिळाला. कारण अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी यांनी या मालिकेचे प्रमोशन केले होते. त्यामुळे साहजिकच प्रेक्षक मालिकेकडे वळतील असा विश्वास वाहिनीला आहे.