ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांकने अप्पूला घरी आणले, त्यामुळे कानिटकर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मात्र आता या मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे. शशांक केक कापत असतानाच अप्पूचा एक खास फ्रेंड तिथे हजेरी लावत आहे. या फ्रेंडला पाहून अप्पू मात्र त्याला मिठीच मारायला जाते. हे पाहून शशांकसह कानिटकर कुटुंब गोंधळात पडतं. तिचा हा खास फ्रेंड अप्पू आणि शशांकच्या नात्यात दुरावा तर आणणार नाही ना. अशी पुसटशी शंका मालिकेच्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. अप्पूच्या फ्रेंडची भूमीका आशुतोष कुलकर्णी साकारत आहे. मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट येणार हे प्रेक्षकांना अपेक्षित असतेच.
त्यात आता अप्पू देखील काय नवा गोंधळ घालणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. आशुतोष कुलकर्णी या मालिकेत नव्याने दाखल झाल्याने मालिका अधिक रंजक झाली आहे. साथ दे तू मला, गंध फुलांचा गेला सांगून, मिस मॅच, कुणी मुलगी देता का मुलगी अशा चित्रपट मालिकेतून अशुतोष महत्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे. गेल्या वर्षी रुचिका पाटील हिच्यासोबत आशुतोष विवाहबद्ध झाला. अगदी मोजक्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसमवेत त्यांनी हे लग्न केलं. यावेळी धनश्री काडगावकर तसेच सायली देवधर यांनी त्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. रुचिका पाटील ही देखील अभिनेत्री आहे. गणपती बाप्पा मोरया, असे हे कन्यादान या मालिकांमधून ती झळकली आहे.
२०१४ सालच्या श्रावण क्वीन स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. या सौंदर्य स्पर्धेत तिने सेकंड रनरअप होण्याचा मान पटकावला. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आशुतोष पुन्हा छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. मात्र त्याच्या येण्याने मालिकेचा ट्रॅकच बदलला आहे. अप्पू आणि शशांकच्या सुखी संसारात आता हे नवीन आलेलं वादळ कधी कमी होईल हे येत्या काही भागातच पाहायला मिळेल. शिवाय आशुतोषचा दमदार अभिनय पुन्हा अनुभवने ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील या नवीन भूमिकेसाठी आशुतोष कुलकर्णीला मनःपूर्वक शुभेच्छा.