Breaking News
Home / मराठी तडका / ​वय कमी असल्याने अभिनेत्रीच्या वडिलांनी चित्रपट केला होता साईन.. अशी ही बनवाबनवी चित्रपटाच्या खास आठवणी
ashi hi banva banwi movie
ashi hi banva banwi movie

​वय कमी असल्याने अभिनेत्रीच्या वडिलांनी चित्रपट केला होता साईन.. अशी ही बनवाबनवी चित्रपटाच्या खास आठवणी

२३ सप्टेंबर १९८८ रोजी ‘अशी ही बनवा बनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला प्रदर्शित ​​होऊन ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत, आजही या चित्रपटाची जादू रसिकांच्या मनात घर करून आहे. अशी ही बनवाबनवी चित्रपट म्हटला की, ‘तुमचे सत्तर रुपये वारले’ , ‘ धनंजय माने इथेच राहतात का?’ , ‘नवऱ्याने टाकलंय हिला’, ‘ सारखं सारखं याच अंगाला काय?’, ‘लिंबू कलरची साडी’ आठवल्याशिवाय राहत नाही. या चित्रपटाच्या काही खास आठवणी आपण जाणून घेऊयात.

ashi hi banva banwi movie
ashi hi banva banwi movie

या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका म्हणजेच अभिनेत्री प्रिया बेर्डे हिचे चित्रपटावेळी वय कमी होते त्यामुळे तिच्या वडिलांनी अरुण कर्नाटकी यांनी हा चित्रपट साइन केला होता. ‘ ग कुणीतरी येणार येणार गं…’ या चित्रपटाचे शूटिंग पुण्यात करण्यात आले होते. घराच्या गच्चीवर हे शूटिंग रात्रभर चालू असल्याने अनेकांची झोपमोड झाली होती अशी गोड आठवण सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत दिली होती. ज्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पुण्याच्या प्रभात टॉकीजमध्ये फर्स्ट क्लासचे तिकीट ३ रुपये आणि बाल्कनीचे तिकीट ५ रुपये इतके होते. तरीही रसिकांच्या भरभरून प्रतिसादाने या चित्रपटाने तब्बल ३ कोटींचा गल्ला जमा केला होता. मराठी चित्रपट सृष्टीतील एक सुवर्ण पान अशी या चित्रपटाने ओळख निर्माण केली होती. चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून सचिन पिळगावकर यांनी एक किस्सा सांगितला होता.

dhananjay mane ethech rahtat ka
dhananjay mane ethech rahtat ka

​”आपण कुठल्याही गोष्टीला आकार देत असतो त्यावेळी आपल्याला ती गोष्ट कशी होईल याची वय कमी असल्याने अभिनेत्रीच्या वडिलांनी चित्रपट केला होता साईन…अशी ही बनवाबनवी चित्रपटाच्या काही खास आठवणी​” ​चित्रपट बनवताना अनेक आठवणी आहेत. त्यात मी चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्याचे चित्रीकरण सुरू असताना निर्माते किरण शांताराम यांना म्हणालो होतो की मला ते रजत महोत्सव पूर्ण झाल्यानंतर सन्मानचिन्ह देतात ते बनवणाऱ्या कलाकारांना भेटायचं आहे. त्यावेळी मी त्यांना भेटून सन्मानचिन्ह बनवून घेतलं. त्यावेळी मला त्या कलाकारांनी ​वेड्यात काढलं असेलही पण तो माझा आत्मविश्वास होता. जस जसा चित्रपट पूर्ण होत होता तसतसं मला चित्रपट लोकप्रियतेचा शिखर गाठेल हा विश्वास मनात पक्का होत ​गेला. आज ​तेहतीस वर्षांनंतरही हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरतो आहे.’ असे सचिन पिळगावकर यांनी सांगितले होते.

ashi hi banva banvi cast
ashi hi banva banvi cast

आज ३​चित्रपटातील बऱ्याचशा कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा, जयराम कुलकर्णी, विजू खोटे, सिद्धार्थ (सुशांत) रे, सुहास भालेकर, मधू आपटे, बिपीन वर्टी, लता थत्ते हे कलाकार आज हयात नसले तरी त्यांनी वठवलेल्या चित्रपटातील भूमिका अजरामर ठरल्या आहेत हे मराठी प्रेक्षक कधीही विसरणार नाही​त.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.