महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दादूस म्हणजेच अभिनेते अरुण कदम आजोबा झाले आहेत. अरुण कदम यांची लेक सुकन्याला पुत्ररत्न झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सुकन्याने मॅटर्निटी फोटो शूट केले होते. त्यावेळी सुकन्याचा ट्रॅडिशनल लूक पाहून सगळ्यांनी तिचं मोठं कौतुक केलं होतं. हे फोटोशूट करताना अरुण कदम यांच्या लेकीने नऊवारी साडी नेसली होती तर त्यांच्या जावयाने धोतर आणि कोट असा पेहराव केला होता. सुकन्या आई होणार हे कळताच अरुण कदम आपल्या लाडक्या लेकीची खूप काळजी घेत होते.
लेकीला काय खावंसं वाटतंय काय नाही हे सगळं ते एक आईच म्हणून तिचे डोहाळे पुरवत होते. अरुण कदम यांचा त्यांच्या लेकीवर खूप जीव आहे. सुकन्या प्रेग्नन्ट असताना ते तिला जागेवर सगळं आणून देत होते अगदी जेवणानंतर हात धुण्यासाठीही ते तिला नॅपकिन आणून देत असत. अरुण कदम यांच्या पत्नी वैशाली या देखील आपल्या नातवंडाच्या आगमनासाठी खूप उत्सुक होत्या. नातवासाठी पाळणा खरेदी करण्यापासून ते त्याला झोपायला लागणाऱ्या गोधडीपर्यंत सर्व गोष्टींची त्यांनी खरेदी करण्यास सुरुवात केली होती. प्रवासात जिथे पाळणा दिसेल तिथे जाऊन ते चौकशी करत असत. त्यामुळे नातवासाठीचा त्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहताना दिसत होता. अधिक मासातही अरुण कदम यांनी जावयाचे मानपान केले होते, तेही अगदी थाटात.
साग्रसंगीत भोजन आणि चांदीच्या वस्तूंची भेट देऊन त्यांनी जावयाचा मानपान वाढवला होता. तर सुकन्याच्या सासरच्या मंडळींनाही त्यांना भेटवस्तु देऊन मानसन्मान केला होता. त्यामुळे लेक सुकन्याच्या बाबतीत अरुण कदम खूपच हळवे आहेत, हे त्यांच्या चाहत्यांना समजले होते. आता तर नातवाच्या येण्याने अरुण कदम यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. दादूस आता आजोबा बनल्यामुळे त्यांच्यावर सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच महाराष्ट्राची हस्यजत्रा या शोचे नवे पर्व सुरू झाले आहे. त्यामुळे बिझी शेड्युल असले तरी वेळात वेळ काढून ते पुढेही आपल्या नातवाला भेटण्यासाठी तेवढेच उत्सुक असणार आहेत.