Breaking News
Home / जरा हटके / महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम लाडका दादूस होणार आजोबा.. सोहळ्याची जोरदार चर्चा
arun kadam sukanya kadam
arun kadam sukanya kadam

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम लाडका दादूस होणार आजोबा.. सोहळ्याची जोरदार चर्चा

​महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे अनेक कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली आहे. या शोने काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. त्यामुळे ही कलाकार मंडळी आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम एन्जॉय करताना दिसत आहेत. सगळ्यांचा लाडका दादुस म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अरुण कदम यांनीही आपला वेळ कुटुंबाला देत लाडक्या लेकीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात केलेला पाहायला मिळतो. अरुण कदम यांची लेक सुकन्याचा काही वर्षांपूर्वी विवाहसोहळा पार पडला होता. सुकन्या लवकरच मातृत्व सुख अनुभवणार आहे. त्यामुळे अरुण कदम नातवंडाच्या जोरदार तयारीला लागलेले आहेत.

arun kadam sukanya kadam
arun kadam sukanya kadam

लाडक्या लेकीचं बेबी शॉवर म्हणत अरुण कदम यांनी या सोहळ्याचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. या सोहळ्याला अरुण कदम यांच्या पत्नी वैशाली कदम यांनीही चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेतलेले आहे. दोन दिवसांपूर्वी वैशाली आणि अरुण कदम यांनी सुकन्याचे डोहाळजेवण साजरे केले. आम्ही पाळणा सुद्धा शोधतोय अशी प्रतिक्रिया अरुण कदम मीडियाशी बोलताना देतात. आपण आजोबा होणार हीच गोष्ट अरुण कदम यांना सुख​​द आनंद देणारी आहे. या आनंदात ते जिथे जातील तिथे नातवासाठी काय घेऊ आणि काय नको अशा मनस्थितीत आहेत. त्यांच्या स्वप्नातही नातवंडासाठी काय करू आणि काय नको असं त्यांना झालं आहे. ते जिथे रस्त्याने जातील तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे त्यांना बघायला मिळतात.

arun kadam daughter
arun kadam daughter

जुन्या काळातील पाळणे त्यांचे विशेष आकर्षण आहे असे ते म्हणतात. तर लाडका दादूस अरुण कदम यांच्या पत्नी वैशाली देखील आपल्या नातवंडाच्या आगमनाच्या तयारीला लागलेल्या आहेत. सुकन्याच्या बालपणीची गोधडी त्यांनी आजही तशीच जपून ठेवली आहे. ही गोधडी सुकन्याच्या मुलांनी वापरावी अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. तर लेक सुकन्याला कन्यारत्न प्राप्ती व्हावी अशी तिची इच्छा आहे. आपल्याला मुलगी व्हावी तिला नटताना पाहायला मला आवडेल असे सुकन्या म्हणते. बेबी शॉवर निमित्त सेलिब्रिटी मंडळींनी देखील हजेरी लावली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम आणि सर्वांचे लाडके दादूस अरुण कदम, पत्नी वैशाली आणि सोबत लेक सुकन्या यांचे मनापासून अभिनंदन.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.