मराठी विश्वात कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. अशातच सिंघम बॉलिवूड चित्रपट अभिनेता अशोक समर्थ यांच्या मेहुणीचे लग्नही मोठ्या थाटात पार पडलेले पाहायला मिळाले. अशोक समर्थ यांची पत्नी शीतल पाठक याही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. बाय गो बाय, मंडळी तुमच्यासाठी कायपण, सामर्थ्य अशा चित्रपटातून शीतल पाठक यांनी मराठी नायिका म्हणून एक काळ गाजवला आहे. शीतल पाठक हिची बहीण अपर्णा पाठक ही देखील कथक नृत्यांगना असून तिने अनेक मंचावर नृत्याचे सादरीकरण केले आहे.

कॉलेजमध्ये असतानाच अपर्णाला मॉडेलिंगचे वेध लागले होते. २०२१ मध्ये तिने मिस नवी मुंबईकरचा किताब पटकावला होता. काल मंगळवारी १२ मार्च रोजी अपर्णा पाठक हिने अभिनेता, गायक, कोरिओग्राफर असलेल्या अतित कुमार पांडे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अपर्णा आणि अतित कुमार यांचे हे डेस्टिनेशन वेडिंग अगदी शाही थाटात पार पडले असून सेलिब्रिटींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. अपर्णाने तिच्या लग्नात हेवी डिझायनर घागरा परिधान केला होता. तर अतितने सफेद रंगाच्या कपड्यांना पसंती दिली होती. अतित कुमार पांडे हा लोकप्रिय गायक आहे युट्युबवर अनेक जुन्या नव्या गाण्याची सांगड घालत त्याने रिमिक्स गाणी बनवली आहेत. तर आदिशक्ती या नावाने त्याने अकॅडमी सुरू केली आहे.

याच अकॅडमी मार्फत अतित आणि अपर्णाची ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेम जुळून आले. अपर्णाच्या लग्नाचे काही खास क्षण शितलने सोशल मीडियावर शेअर करत तिला आणि अतितला शुभेच्छा दिल्या होत्या. शीतल पाठक आणि अपर्णा दोघीही कथक नृत्यांगना आहेत. शीतल पाठक हिने खूप कमी वयातच मराठी चित्रपट क्षेत्रात जम बसवला होता. तिच्या पाठोपाठ तिची बहीण अपर्णा पाठक हिनेही मॉडेलिंगकडे मार्ग वळवला. अपर्णा आणि अतित दोघेही उत्कृष्ट डान्सर आहेत. याचा फायदा आता त्यांच्या अकॅडमीसाठी निश्चितच होणार आहे. कोरिओग्राफर, गायक, अभिनेता, सूत्रसंचालक अशा बहुगुणी अतित सोबत अपर्णा विवाहबद्ध झाली. आणि मिस नवी मुंबईकर पांडे कुटुंबाची सून बनून आता घर संसाराची आणखी एक जबाबदारी सांभाळणार आहे.