अनुपमा ही हिंदी मालिका टीआरपीच्या रेसमध्ये नेहमीच पुढे असलेली पाहायला मिळाली आहे. आई कुठे काय करते ही मालिका म्हणजे अनुपमा या मालिकेचा रिमेक आहे. त्यामुळे या दोन्ही मालिकांचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील पात्र देखील प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अनुपमा मालिकेतील नंदिनीचे पात्र मराठी अभिनेत्री अनघा भोसले हिने साकारली आहे. या भूमिकेमुळे अनघा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. एक दोन मालिका साकारणाऱ्या अनघाने नुकताच मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.अनघा केवळ मालिकाच सोडणार नसून ती अभिनय क्षेत्रातून संन्यास घेताना दिसत आहे.
अध्यात्मचा मार्ग स्वीकारत तिने ही ठाम भूमिका सोशल मीडियावर जाहीर केली आहे. अनघा भोसले हिने अनुपमा या मालिके अगोदर राजश्री प्रॉडक्शनच्या दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अनुपमा मालिकेने अनघाला चांगली लोकप्रियता मिळवून दिली. परंतु एका मुलाखतीत तिने मालिकेत काम करण्याबद्दल एक मत व्यक्त केले होते की, हे क्षेत्रात खूप ग्लॅमरस आहे. या क्षेत्रात तुम्हाला स्पर्धेत उतरावे लागते तेव्हा तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. इथे राजकारण चालते, सोशल मिडीयावर तुम्हाला नेहमी ऍक्टिव्ह राहावे लागते. मात्र अशा गोष्टी तुमच्यावर नेहमीच दबाव आणतात.
तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाहीतर तर तुम्हाला मागे राहावे लागते. ह्या सर्व गोष्टी माझ्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत. अर्थात मी अध्यात्मकतेकडे जाण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा प्रेक्षक आदर करतील आणि मला पाठिंबा देतील असा विश्वास आहे. आपल्या सर्वांचाच देवावर विश्वास आहे, आपण जो जन्म घेतलाय त्याचा हेतू साध्य करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर तुम्ही भगवतगीता वाचा. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असे अनघाने सांगितले आहे.