मित्रहो, सोशल मीडियावर अनेक कलाकार सक्रिय असतात, त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो नेहमी शेअर करत असतात. खूपसे अभिनेते, अभिनेत्री आपले सुंदर-सुंदर फोटो पोस्ट करतात, त्यांचे चाहते देखील त्या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक्स देतात. सोशल मीडियावरूनच आपल्याला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची जास्त ओळख होते. तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही रंजक गोष्टी देखील माहीत होतात. चाहते आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या आयुष्यात जे काही घडते, याची नोंद चाहते ठेवत राहतात.
बॉलिवूड प्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार चर्चेत असतात, त्यातील अंशुमन विचारे हा अनेकांचा लाडका कलाकार आहे. त्याचा अभिनय खूप कौतुकास्पद असतो, तो चित्रपटात कॉमेडी सुद्धा खूप छान करतो. त्याने आजवर श्वास, पोस्टर बॉईज, विठ्ठला शप्पथ, अशा अनेक चित्रपटात काम केले असून काही मालिकामध्येही तो झळकला आहे. शिवाय मोर्चा चित्रपटाद्वारे तो गायनाच्या क्षेत्रात ही आला आहे. अंशुमन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. आपल्या कुटुंबातील सर्वांचे फोटो तो शेअर करत असतो. अंशुमनच्या अकाउंटवर त्याच्या पत्नीचे देखील भरपूर फोटो शेअर होत असतात. त्याच्या सुंदर पत्नीचे नाव पल्लवी असून ती व्यवसायाने वकील आहे. पल्लवी एक वकील असूनही खूप हुशार, समजूतदार आणि प्रभावी व्यक्तिमत्वाची असल्याचे व्हिडीओ मधून सहज जाणवते. त्यांची लेक अन्वी खासकरून रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत असते. अंशुमन आणि पल्लवीचे हे सुंदर जोडपे लाडक्या अन्वीचे अनेक फनी व्हिडीओ शेअर करत असते.अन्वी खूपच बोलकी आहे आणि दिसायलाही अगदी तीच्या आईसारखी सुंदर आहे. तीचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता..पाहूया तो मजेशीर किस्सा..
“आई मी तूला कधीच म्हातारी होऊ देणार नाही” हे तीचे बोबडे बोल हृदयाला स्पर्श करून जातात. छोट्या अन्वीचा हा व्हिडीओ पाहताना खूप हळवेपण जाणवते, यामध्ये अन्वी आणि तिच्या आईचा संवाद आपणास ऐकायला मिळतो, ती चिमुकली तिच्या आईसाठी भातुकलीच्या खेळातील जेवण बनवत असते. तेव्हा आई विचारते “तू बनवलं का काही माझ्यासाठी”, यावर चिमुकली म्हणते “हो मी बनवलं”, तू माझी काळजी घेणार मम्मा?, माझे लाड करणार? मी म्हातारी झाल्यावर मला सांभाळणार? यावर प्रश्नांवर अन्वी म्हणते आई तू म्हातारी होणार आणि मग मी तुला घाबरणार, कारण मी म्हातारीला खूप घाबरते, मी तुला म्हातारी होऊच देणार नाही कारण तू माझी मम्मा आहेस आणि तू खूप सुंदर दिसते. आता मी साबुदाण्याची खिचडी बनवते”. लेकीचे बोबडे गोड शब्द ऐकून आई पल्लवी खूप खुश आणि भावुक झाली आहे असे सहज लक्षात येईल तसेच पल्लवी तिच्या लेकीला जवळ ओढून खूप प्रेम देत आहे.
अन्वीच्या या व्हिडीओ मधील बोल कोणालाही हळवे बनवून जातील, ती खूप समजदार आणि बोलकी आहे. अंशुमनची ही क्युट फॅमिली खूपच छान आहे. ती अशीच आनंदी राहो ही सदिच्छा. अंशुमन आणि पल्लवी तसेच चिमुकल्या अन्वीला सुखी आनंदमयी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.