झी मराठी वाहिनीवरील बस बाई बस या रिऍलिटी शो ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजकारण, मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींकडून खाजगी गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. त्यामुळे या शोची भुरळ प्रेक्षकांना पडलेली पाहायला मिळत आहे. काल या शो चा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला. सुबोध भावेने सूत्रसंचालनाची जबाबदारी या शोमध्ये चोख बजावलेली पाहायला मिळत आहे. या पहिल्याच एपिसोडमध्ये सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावलेली पहायला मिळाली होती. सुप्रिया सुळे यांनी प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. या प्रश्नांमुळे आणि उत्तरांमुळे प्रेक्षकांचे मात्र नक्कीच मनोरंजन होत आहे.
आज शनिवारच्या भागात अमृता खानविलकर दाखल होणार आहे. अमृताला स्वयंपाक येतो का? तुला भाकरी बनवता येते की चपाती? अशी धमाल प्रश्न विचारून या शोमध्ये माजमस्तीचे अधिक रंग चढवले जाणार आहेत. झी मराठीवरील बँड बाजा वरात हा शो नुकताच एक्झिट करण्यात आला आहे. या शोच्या ठिकाणी बस बाई बस हा मनोरंजनात्मक शो सुरू करण्यात आला. पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन झाले. या शोमुळे सेलिब्रिटींच्या आयुष्यातल्या अनेक छोट्या मोठ्या गमतीशीर गोष्टी उघड झाल्या. त्यांचे खाजगी आयुष्य समान्यांपेक्षा वेगळे आहे की सर्वसाधारणच आहे. हे प्रेक्षकांना देखील जाणून घ्यायचे असते.
मात्र आता झी वाहिनीने तसा मंच उपलब्ध करून दिला असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शोमध्ये आणखी एक खास वैशिष्ट्य असे की जे प्रेक्षक प्रश्न विचारतात ते मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारताना दिसले आहेत प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न हे सेलिब्रिटिना विचारण्यात येतात. त्यामुळे झी मराठीचा हा शो नक्कीच यशस्वी ठरेल याची खात्री वाटते. आजवरच्या रिऍलिटी शोपेक्षा हा शो थोडासा वेगळा आहे आणि यातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेता येणार असल्याने हा शो टीआरपीच्या स्पर्धेत पुढे येईल अशी आशा वाटते.