मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेतून नियनरावांच्या पात्राने एक्झिट घेतली होती शेवटच्या दिवसाचे शूटिंग असे म्हणत अमित परब याने मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. नुकतेच अमितच्या आईचे दुःखद निधन झाले आहे. अमितच्या आई गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. बरेच दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र त्यांची ही झुंज अखेरीस अयशस्वी ठरली. उपचार सुरू असतानाच २० जुलै रोजी अमितच्या आईने अखेरचा श्वास घेतला. आपल्या आईच्या आठवणीत त्याने एक भावुक पोस्ट लिहिली आहे.
प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आईला गमावण्याचे दुःख हे कधीही भरून न येणारे असते. तू मला गेल्या २८ वर्षात शिकवलेलली मूल्ये आणि नीतिमत्तेमुळे तू दिलेले हे विचार माझ्यात कायमच राहतील. तू खरी लढाऊ आहेस आणि तू मला तसं व्हायला शिकवलंस. हे सगळं सुरळीत होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मी फक्त देवाच्या इच्छेला सहमती दिली कारण त्याने मला खात्री दिली की त्याने तुझ्यासाठी दुसर्या बाजूने आणखी चांगल्या गोष्टींची योजना आखली आहे. आणि ते माझ्यासाठी स्वार्थाचे ठरले असते जर मी तुला तुझ्या भल्यासाठी जाऊ दिले नसते. मला आनंद आहे की माझा अभिमान वाटेल असं मी करून दाखवलं आणि त्याचा तुला नेहमीच अभिमान वाटेल.
आता इथून पुढे मी तुझ्या पुढच्या प्रवासात तुझ्यासोबत नसेन म्हणून कृपया स्वतःची काळजी घे आणि पुरेशी विश्रांती घे. माझ्या पुढच्या जन्मातही माझी आई म्हणून तुला पुन्हा भेटण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे आणि मी पुन्हा तुझ्या गर्भात येण्याची आणि तो क्षण अनुभवण्याची प्रतीक्षा करतो आहे. तोपर्यंत कृपया विश्रांती घे. तुझ्या सोनूकडून खूप खूप प्रेम.’ प्रत्येक आईवडिलांची ईच्छा असते की आपल्या मुलाने कुठेतरी नाव कमवावे स्वतःच्या हिमतीवर घडावे. अमितने देखील त्याच्या आईची ही स्वप्न पूर्ण केली होती. अमितने एमबीएचे शिक्षण पूर्ण करून कार्पोरेट क्षेत्रात नोकरी चांगली स्वीकारली होती.
आपली नोकरी सांभाळून तो मन उडू उडू झालं या मालिकेत अभिनयाची आवड जोपासताना दिसला. त्याने साकारलेलं नयन रावांचे पात्र विरोधी जरी असले तरी या भूमिकेने अमितला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यामुळे ही भूमिका त्याच्यासाठी खूप महत्त्वाची ठरली होती. या भूमिकेमुळे अमित प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला मात्र आज हे सुखाचे क्षण पाहण्यासाठी आता त्याची आई या जगात नाही हे जाणूनच मन गहिवरून जातं. या दुःखातून अमितला व त्याच्या कुटुंबियाला सावरण्यास बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.