मालिकेमुळे त्यातील कलाकारांचे एकमेकांसोबत जिव्हाळ्याचे नाते बनलेले असते. कथानकाला अनुसरून बऱ्याचदा वेगवेगळ्या पात्रांची त्यात एन्ट्री केली जाते. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतही असेच एक नंदीनीचे पात्र आलेले दिसले. अभि आणि लतीकाच्या मदतीला धावून येणारी ही नंदिनी प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसली. मात्र आता बाय बाय नाशिक म्हणत नंदिनीच्या पात्राने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. नंदिनीचे पात्र अभिनेत्री अदिती द्रविड हिने साकारले होते. गेल्या आठ नऊ महिन्यांपासून ती मालिकेत महत्वाची भूमिका बजावताना दिसली.
निरोप देताना अदिती सहकलाकारांना खूप मिस करणार असल्याचे म्हणते. एकीकडे अदितीची एक्झिट होत असली तरी आता या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने बऱ्याच वर्षांचा लीप घेतला आहे. या कालावधीत लतीकाच्या आयुष्यात खूप बदल घडून आला आहे. अभिच्या मृत्यू पश्चात लतिका आपल्या लेकीचा सांभाळ करत आहे, मात्र दौलत सारख्या माणसाचा सामना करावा लागत आहे. दौलत आणि सरपंच बाईंच्या अरेरावीला ती तोडीसतोड उत्तर देत असताना मदतीला आता देवा धावून आलेला आहे. देवा सोबत सुरुवातीला लतीकाचे वाद झाले होते. मात्र आपल्या मुलीला सांभाळून घेणारा देवा हळूहळू लतीकाच्या मनात जागा करताना दिसत आहे.
मालिकेत देवाच्या आईची एन्ट्री झाली आहे. देवाची आई म्हणजेच विद्या ताईंची भूमिका गार्गी फुले साकारणार आहेत. गार्गी फुले यांनी तुला पाहते रे मालिकेत काम केले होते. त्यानंतर त्या राजा राणी ची गं जोडी या मालिकेतून बेबी मावशीची भूमिका साकारली होती. या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे, त्यामुळे गार्गी यांना सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत येण्याची संधी मिळाली आहे. गार्गी फुले या मालिकेत आल्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. आता दौलतराव आणि सरपंच बाईंच्या कारस्थानाला देवाची आई चोख उत्तर देणार आहे. त्यामुळे या दोघांची अशी फजिती पाहून प्रेक्षक त्यांच्या भूमिकेवर खुश झाले आहेत. या नवीन भूमिकेसाठी गार्गी फुले यांनी एक खास गेटअप देखील केला आहे.