मराठी चित्रपट सृष्टीतील ५० च्या दशकातील काळ गाजवणारी ही अभिनेत्री आहे “चित्रा नवाथे”. ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून त्यांनी मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. याच चित्रपटातील चित्रा ह्या नावाने पुढे त्यांना ओळखले जाऊ लागले. चित्रा यांचे पूर्वाश्रमीचे नाव आहे “कुसुम सुखटणकर”.
१९५१ सालच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी वहिनीच्या बांगड्या, गुळाचा गणपती, भैरवीर, छत्रपती शिवाजी, बोलविता धनी, राम राम पाव्हण आशा तब्बल २५ चित्रपटातून नायिकेच्या भूमिका बजावल्या यात त्यांना सूर्यकांत , चंद्रकांत, राजा गोसावी यांच्यासोबत झळकण्याची संधी मिळाली होती.
चित्रपट सह दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. लग्नानंतर मात्र त्यांनी अभिनयातून काढता पाय घेतला घरसंसार आणि मुलाचे संगोपन करत असतानाच तरुण वयात त्यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले. तर चित्रा यांचे पती राजा नवाथे यांचेही २००५ साली निधन झाले होते. एकाकी जीवन व्यतीत करणाऱ्या चित्रा यांनी भाऊ बहिणीचा आधार घेतला त्यांची सख्खी बहीण रेखा कामत या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेतील सोज्वळ माई त्यांनी साकारली होती तर तरुणपणी चित्रा यांच्या सोबत त्यांनी लाखाची गोष्ट चित्रपटात एकत्रित काम केले होते. चित्रा यांनी वृद्धपकाळात टिंग्या, बोक्या सातबंडे या चित्रपटातून आजी ची भूमिका साकारली होती. परंतु एकाकी जीवन जगणाऱ्या चित्रा नवाथे या गेल्या काही वर्षांपासून पायाला दुखापत झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाल्या होत्या. को’रो’नाच्या काळात त्यांना दवाखान्यातून निघून जायला सांगितले होते. त्यानंतर त्या कुठे आहेत याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनाही नव्हती. परंतु मागील काही दिवसांपासून त्या मुलुंड येथील “गोल्डन केअर” वृद्धाश्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे. वृद्धपकाळात कलाकारांची होणारी परवड हे काही नवीन गोष्ट नाही मात्र अशा कलाकारांसाठी शासनाने किंवा मराठी सृष्टीने काहीतरी पाऊल उचलावे हीच एक माफक अपेक्षा आहे. आर्थिक परिस्थिती असो किंवा एकाकी जीवन यामुळे अशा एक काळ गाजवलेल्या कलाकारांची झालेली दुरावस्था निंदनीय आहे यावर काहीतरी ठोस निर्णय घेण्यात यावा ….