मराठी चित्रपट अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे या दोघींनीही काही वेळापूर्वीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही.” असे म्हणत दोघींनीही स्वतःच्या ओठावरची लिपस्टिम पुसून काढली आहे. लिपस्टिक पुसत एक मेसेज या व्हिडिओतून दिलेला पाहायला मिळतोय. Ban lipstick असे हॅशटॅग वापरून यापुढे मी लिपस्टिक वापरणार नाही असे जाहीर केले आहे.

तेजस्विनी पंडित आणि सोनाली या दोघीही मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या नायिका आहेत. लिपस्टिक बॅन करण्यामागे त्यांचा नेमका काय हेतू आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र ह्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अर्थात तेजस्विनी पंडित आपल्या आगामी प्रोजेक्ट्स साठी लक्ष्य वेधून घेत असणार अशी चर्चा आहे. आपल्या चित्रपटाचे किंवा नाटकाचे प्रमोशन व्हावे या हेतूने अनेकांनी असे उपाय केलेले आहेत. दादा एक गुड न्यूज आहे ह्या नाटकाच्या प्रमोशनवेळी देखील पुण्यात बॅनर लावले होते. तर स्वीटी सातारकर ह्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाचा नायक म्हणजेच संग्राम समेळ याने एक व्हिडिओ शेअर करून आपल्याला एक मुलगी फोन करून खूप त्रास देत असल्याचे म्हटले होते. तेव्हा ह्या हटके प्रमोशनमुळे चित्रपट आणि नाटक तुफान प्रसिद्धी मिळवताना दिसले.

तेजस्विनी आणि सोनालीचा हे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. आणि त्यावर प्रेक्षकांनी देखील चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे व्हिडीओ नेमका कशासाठी आहे याचा उलगडा अजून तरी झालेला नाही. त्यांचा हा व्हिडीओ प्रमोशनचाच एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओबाबत येत्या काही दिवसातच अधिक स्पष्टीकरण मिळेल पण त्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.