Breaking News
Home / मराठी तडका / ​अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे आणखी एक हॉटेल सुरु.. चोखंदळ खवय्यांसाठी हक्काची मेजवानी
priya berde
priya berde

​अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे आणखी एक हॉटेल सुरु.. चोखंदळ खवय्यांसाठी हक्काची मेजवानी

​अभिनेत्री प्रिया बेर्डे या मूळच्या कोल्हापूरच्या त्यामुळे खाणे आणि इतरांना खाऊ घालणे त्यांना खूप आवडायचे. तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा बनवण्यात त्या अगदी पटाईत. लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड असलेल्या प्रिया बेर्डे उत्तम स्वयंपाक करायच्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत ल​​ग्न झाल्यावर देखील त्या सासरी गेल्यावर कोकणी पद्धतीचे जेवण बनवायला शिकल्या होत्या. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवून ते स्वादिष्ट कसे होतील यात त्यांचा हातखंडा. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन हॉटेल व्यवसायात उतरण्याचे ठरवले. लोणावळा परिसरात त्यांनी अनेक ठिकाणांना भेटी दिल्या मात्र हॉटेल साठी सोयीस्कर जागा त्यांना मिळत नव्हती.

priya berde
priya berde

अखेर बावधन परिसरात त्यांना एक ठिकाण आवडले आणि त्यांनी ‘चख ले’ या नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला. या हॉटेलमध्ये सुरुवातीला शाकाहारी खाद्य पदार्थ मिळू लागले त्यानंतर खवय्यांच्या आग्रहाखातर मांसाहारी खाद्य पदार्थ देखील तिथे बनवले जाऊ लागले. हे हॉटेल स्वतः प्रिया बेर्डे चालवत नसल्या तरी अनेकदा त्या हॉटेलमध्ये येऊन तिथले कामकाज पाहण्यासाठी येतात. अभिनेत्री प्रिया बेर्डेचे हॉटेल म्हणून पुण्यातील अनेक खवय्यांनी त्यांच्या हॉटेलला भेट देऊन तेथील पदार्थांची चव चाखली आहे. शिवाय तिथल्या पदार्थांचे कौतुक देखील केले आहे. याच प्रतिसादानंतर प्रिया बेर्डे पुण्यातच आणखी एक हॉटेल सुरू करत आहे. नुकतेच प्रिया बेर्डे यांनी या हॉटेलबाबत जाहीर केले आहे. बावधन जवळच असलेल्या पौंड रोडवर हे दुसरं हॉटेल सुरू केलं असून या हॉटेललाही ‘चख ले’ हेच नाव दिले आहे. चख ले या नावाने दुसरे हॉटेल सुरू करताच प्रिया बेर्डेचे सेलिब्रिटींकडून मोठे कौतुक होताना दिसत आहे. हॉटेल व्यवसायात पुन्हा एकदा उचललेलं हे पाऊल इतर महिलांसाठी निश्चितच प्रेरणा देणारं आहे.

prreeya berde with swanandi and abhinay
prreeya berde with swanandi and abhinay

नव्याने स्थापन केलेल्या तिच्या ह्या हॉटेलमध्ये खवय्यांना पंजाबी, चायनीज, पावभाजी, ज्यूस असे पदार्थ चाखता येणार आहेत. प्रिया बेर्डेची लाडकी लेक स्वानंदी बेर्डे हिनं देखील काही दिवसांपूर्वीच व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले होते. ‘Ehaa’s creations’ या नावाने तिने कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. सायली गवळी आणि स्वानंदी बेर्डे या दोघींनी मिळून या व्यवसायाची सुरुवात केली आहे. त्यामध्ये एक्सकलुझिव्ह साड्या, ड्रेस मटेरिअल्स, दुपट्टा, ज्वेलरीच्या विविध व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील. प्रिया बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे यांना त्यांच्या नव्या व्यवसायानिमित्त सेलिब्रिटींनी शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले आहे. प्रिया बेर्डे या अभिनय, राजकारण आणि हॉटेल व्यवसाय अशा तिन्ही क्षेत्राची धुरा सांभाळताना दिसत आहेत, त्यानिमित्त त्यांचे खूप खूप कौतुक आणि मनःपूर्वक शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.