सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये प्राजक्ता माळी सुत्रसंचलिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. लवकरच प्राजक्ताचे अभिनित केलेले एक दोन नव्हे तर तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वी पावनखिंड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. येत्या १८ फेब्रुवारी रोजी पावनखिंड हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपट गृहात मराठी चित्रपटांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना सोनेरी दिवस आलेले पाहायला मिळत आहेत.

त्यात पांडू, झिम्मा, झोंबिवली, जयंती हे चित्रपट प्रेक्षकांनी हाऊसफुल गर्दी केलेले पाहायला मिळाले होते. पावनखिंड हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांची गर्दी नक्कीच खेचून आणणार असा विश्वास चित्रपटाच्या टीमला आहे. मात्र असे असले तरी केवळ निर्बंधांमुळे चित्रपट गृह पूर्ण क्षमतेने खुले करण्यास परवानगी दिलेली नाही. इतर सर्व क्षेत्रावरील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले असले तरी अजूनही चित्रपट गृह आणि नाट्य गृह ५० टक्के क्षमतेनेच भरवले जात आहेत. त्यामुळे प्रजक्ताने लहान तोंडी मोठा घास. पण आता बोलायला हवं असे म्हणत चित्रपट गृह पूर्ण क्षमतेने भरण्याची विनंती केली आहे. मराठी प्रेक्षक सूज्ञ आहे हा चित्रपट पाहायला ते नक्कीच उत्सुक आहेत.

नियमांचे पालन करून ह्या कलाकृतीचा आस्वाद प्रेक्षकांना घेता यावा अशी एक नम्र विनंती तिने केलेली पाहायला मिळते आहे.लवकरच शिवजयंती येणार आहे किमान या दिवशी तमाम शिवप्रेमींना, निर्मात्यांना आणि चित्रपट प्रेमींना ही आनंदाची बातमी द्यावी. जेणेकरून १०० टक्के क्षमतेने चित्रपट आणि नाट्यगृह भरतील याचा आम्हा कलाकारांना देखील खूप फायदा होईल. याबाबत मी नम्र विनंती करते आणि प्रेक्षकांनाही आवाहन करते की त्यांनी आमचा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहावा. प्राजक्ता माळीचे आणखी दोन चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
प्रजक्ताने अभिनित केलेल्या चंद्रमुखी या चित्रपटाचे पोस्टर गेल्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी चंद्रमुखीची भूमिका कोण साकारणार हे गुलदस्त्यात ठेवले होते. मात्र प्राजक्ताच ही भूमिका साकारणार असल्याचे चित्रपटाच्या टिझरमधुन नुकतेच पाहायला मिळाले. २९ एप्रिल रोजी चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित राजकीय रशीली प्रेमकहाणी प्रेक्षकांना चंद्रमुखी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनी या चित्रपटांना पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करावी असे आवाहन तिने केलेले पाहायला मिळते आहे.