Breaking News
Home / मालिका / ​​सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्रीच्या आईचे दुःखद निधन
actress aasha gopal mother
actress aasha gopal mother

​​सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्रीच्या आईचे दुःखद निधन

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरीची लाडकी अम्मा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आशा ज्ञाते यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आशा ज्ञाते यांच्या आईचे ८ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. आईच्या जाण्याने आई नाही तर काहीच नाही, मायेचं कवच देवानं नेलं अशी भावना व्यक्त केली आहे. मालिकेत आशा ज्ञाते यांनी साकारलेली अम्मा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. या भूमिकेवर प्रेक्षकांचे खूप प्रेम आहे. त्यांच्या आईच्या निधनाच्या बातमीने मालिकेतील कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या अम्मा याच नावाने त्यांना आता ओळखले जात आहे.

actress aasha gopal mother
actress aasha gopal mother

अम्मा म्हणजेच आशा ज्ञाते या मूळच्या नाशिकच्या आहेत मुंबईत आल्यावर त्यांनी स्वतःच्या कार्तित्वावर कलासृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीला काही काळ नोकरी केली होती. वयाच्या ३२ व्या वर्षी कामगार कल्याण केंद्रच्या जाणीव या नाटकातून त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली होती. या नाटकातील सासूबाईंच्या भूमिकेला त्यांना उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक देखील मिळालं होतं. गेल्या २२ वर्षांपासून त्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. मी रेवती देशपांडे, यदा कदाचित, आम्ही पाचपुते, जागो मोह प्यारे, सौजन्याची ऐशी तैशी, गोठ, लक्ष्य, राजा शिवछत्रपती, स्वामी समर्थ, आमचं सगळं सात मजली, नटसम्राट, अवघाची हा संसार, या सुखांनो या, माझिया प्रियाला प्रीत कळेना अशा नाटक आणि मालिकेतून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

actress aasha gopal
actress aasha gopal

साधारण २०१८ साली त्यांनी आपल्या वयाच्या ५६ व्या वर्षी नाट्यशास्त्र विषयाची पदवी प्राप्त केली आहे हे विशेष. शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांनी घेतलं असून विविध संगीत नाटकातून आपली संगीताची कला जोपासली आहे. आज अम्माच्या भूमिकेमुळे आशा यांच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. अम्मा ही घरकाम असणारी स्त्री जरी असली तरी गौरीची आई म्हणूनच त्यांना जास्त ओळख मिळाली आहे. आशा ज्ञाते यांची मुलगी देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. रेश्मा आणि रिमा या त्यांच्या मुली आहेत यातील रिमा ज्ञाते यांचा नुकताच विवाह पार पडला होता. तर रेश्मा ज्ञाते ही अभिनेत्री तर आहेच शिवाय रेडिओ जॉकी म्हणूनही तीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

आरजे रेश्मा या नावाने रेनबो एफएमसाठी रेडिओ जॉकी बनून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत आता रेश्मा अभिनय क्षेत्रात देखील दाखल झाली आहे. अमृत अनुभव या शॉर्टफिल्ममध्ये रेश्माला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय कोठारे व्हिजन प्रस्तुत आई मायेचं कवच या मालिकेतून रेश्माने सानिका भक्ता ही भूमिका निभावली होती. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अम्मा म्हणजेच आशा ज्ञाते यांच्या आईंना आमच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.