Breaking News
Home / मराठी तडका / ​​कोणीतरी खिल्ली उडवतं, वाटेत आडवा पाय टाकतं अशा वेळेस काय करायचं?​ अभिनेत्याने व्यक्त केली खंत
santosh juvekar raja ala song
santosh juvekar raja ala song

​​कोणीतरी खिल्ली उडवतं, वाटेत आडवा पाय टाकतं अशा वेळेस काय करायचं?​ अभिनेत्याने व्यक्त केली खंत

मराठी सृष्टीत स्वतःच्या बळावर स्थान निर्णय करणारे बरेचसे कलाकार आहेत. अनेक खस्ता खात स्ट्रगल करत त्यांनी मराठी सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली असते. वेळप्रसंगी उपाशी राहून स्ट्रगल केलेले बरेचसे कलाकार तुम्हाला माहीत असतील. मग एवढ्या खस्ता खाऊनही कोणीतरी तुमच्या यशाच्या विरोधात पाऊल उचलत असेल तर त्यावेळी काय करावं असा प्रश्न प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर याला पडला आहे. संबंधित व्यक्ती ही आपल्या मागून आपली खिल्ली उडवतोय हे न समजण्या इतपत कोणीही अभिज्ञ नसतं. त्याची जाणीव त्याला प्रत्येक क्षणालाच वाटू लागत असते. अशा वेळी आपण काय करावं असा प्रश्न त्याने त्याच्या चाहत्यांना विचारला आहे.

santosh juvekar raja ala song
santosh juvekar raja ala song

संतोष जुवेकरची ही पोस्ट सध्या मराठी सेलिब्रिटी विश्वात प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. आपल्या या पोस्टमध्ये संतोष नेमके कोणाला उद्देशून म्हणाला हे स्पष्ट सांगितले नसले तरी त्याची ही पोस्ट गंभीर असल्याने अनेकांनी त्याची दखल घेतलेली पाहायला मिळत आहे. आपल्या पोस्टमध्ये संतोष म्हणतो की, ‘खूप काही सहन करून आणि खूप घासून जेंव्हा तुम्ही कुठेतरी एका पायरीवर पोहोचता आणि अजून खूप काही करण्याच्या प्रयत्नात असता. आणि अश्या वेळेला कुणी उगाच उंगल्या करत असत, तुमच्या नावाने खिल्ली उडवत असत, तुमच्या वाटेत आडवा पाय टाकत असतं. तेंव्हा काय करायचं? मग तो अगदी जवळचा असतो ज्याला आपण जवळच समजतो किंवा कोणी परका अनोळखी असतो. काय करायचं अश्या अडा चो च? तोडायचं की सोडायच?’

actor santosh juvekar
actor santosh juvekar

संतोषच्या या प्रश्नावर त्याच्या अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी वेगवेगळे सल्ले दिलेले पाहायला मिळत आहेत. या गोष्टीवर आजपर्यंत तू जसे दुर्लक्ष केले आहे तसेच दुर्लक्ष कर असेही अनेकांचे म्हणणे आहे. संतोष जुवेकर गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्द्यावरून दूर असलेला पाहायला मिळतो आहे. अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतून तो मृणाल दुसानिस हिच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकला होता. दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. आज १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होत असलेल्या पावनखिंड या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत झळकताना दिसणार आहे. चित्रपटातील राजं आलं राजं आलं हे गाणं संतोषवर चित्रित झालं आहे. अल्पावधीतच प्रेक्षकांनी या गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेतलेलं पाहायला मिळत आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.