मराठी सिनेसृष्टीला अनेक अनमोल हिरे लाभले आहेत. हलाखीच्या परिस्थितून अपार कष्टाने सिनेसृष्टीत चमकणारा असाच एक हिरा म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर. मोरया, झेंडा, शाळा आणि रेगे यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अप्रतिम भूमिका त्याने साकारल्या. उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. आजवर आपण अनेक बॉलिवूड अभिनेत्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकली असेल. मराठमोळ्या संतोष जुवेकरची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी ठरू शकते. कसा होता त्याचा स्ट्रगल प्रवास, चला तर मग जाणून घेऊया.
नुकताच प्रसिद्ध मराठी कार्यक्रम मस्त मजेदार किचन कल्लाकार या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये संतोष जुवेकर आपल्या हलाखीच्या दिवसांची गोष्ट सांगितली. या कार्यक्रमामध्ये संकर्षण कऱ्हाडे जेवणाची थाळी हातात धरून उभा होता. त्यावेळी तो संतोष जुवेकरला म्हणतो की, हे पाहून तुला काय आठवतंय? शेजारी उभे असलेले कलाकार श्रुती मराठे, वैभव तत्ववादी, महाराज प्रशांत दामले आणि संतोष यांची आई हे पाहून थोडेसं संभ्रमात होते. याचे उत्तर देत संतोष जुवेकरने आपल्या सुरूवातीच्या दिवसांची आठवण करून दिली. खिशात दोन पैसे नसताना मिळेल त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी त्याची धडपड ऐकून डोळ्यात पाणी आल्या वाचून रहात नाही. तो म्हणतो, ज्यावेळी मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, त्यावेळी माझ्याकडे जेवणासाठी देखील पैसे नसायचे.
मी कधी कधी मित्राकडे तर कधी मावशीकडे जेवण करायचो. पण रोज रोज जेवायला कोण देणार. खार स्टेशनच्या बाहेर एक हातगाडी आहे, जिथे २० रुपयात जेवण मिळायचं. त्यामध्ये तीन पोळ्या, बटाट्याची भाजी, भात, लिंबाचं किंवा कैरीच लोणचं आणि मिरची कांदा असायचं. तसेच तो पुढे म्हणाला की, जेवत असताना कोणी फोन केला आणि की कुठे आहेस विचारलं. तर सांगायचो की लिलामध्ये आहे. पण, खरंच ही खूप जवळची गोष्ट आहे माझ्या. आयुष्यमधील या खडतर टप्प्यांनी ताठ मानेने जगण्याची दिलेली शिकवण खूप काही सांगून जाते. संघर्ष करत संतोष जुवेकरने आज भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. आज यशाच्या शिखरावर असताना देखील त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत हे विशेष.