झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत रमाची पुन्हा एकदा एन्ट्री झाल्याने मालिका रंजक वळणावर आलेली आहे. या मालिकेमुळे कश्यप परुळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. २००९ सालच्या मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतून कश्यपने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. दोन वर्षात त्याने या मालिकेतून लोकांची चांगली पसंती मिळवली होती. तेव्हा कश्यप प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

पण एक वेळ अशी येते की डोक्यात गेलेली प्रसिद्धीची हवा हे प्रेक्षक लगेचच काढूनही घेत असतात. त्यामुळे तुम्हाला खूप मोठे नुकसान सोसावे लागते. कश्यपच्या बाबतीतही नेमके तेच घडले. मन उधाण वाऱ्याचे या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता आपण चित्रपटात काम करायचं असा निर्णय त्याने घेतला. या मधल्या काळात त्याला चित्रपटाच्या ऑफर देखील मिळाल्या. पण चुकीच्या लोकांच्या सानिध्यात गेल्याने त्याला खूप मोठे नुकसान सोसावे लागले. एकतर चित्रपट तर मिळाले पण काही अर्धवटच बनले. त्यातले काही चित्रपट पूर्णत्वास देखील आले पण काही कारणास्तव ते प्रदर्शित होऊ शकले नाही. त्यामुळे कश्यपला प्रसिद्धीपासून वंचित राहावे लागले. मन उधाण वाऱ्याचे मालिकेमुळे लोकांनी डोक्यावर घेतलं.

पण दुसऱ्याच बाजूला चित्रपट करायचे या विचाराने त्याला प्रेक्षकांची उपेक्षाही सहन करावी लागली. याची प्रचिती त्याला वेळोवेळी मिळाली होती. दरम्यान सुरुवातीच्या चार ते पाच वर्षांच्या काळात त्याने जवळपास २२ मालिका नाकारल्या होत्या. दरम्यान काही चित्रपट त्याचे लोकप्रिय झाले देखील. पण आता आपण मालिकेकडे वळलं पाहिजे कारण मालिका तुम्हाला लगेचच प्रसिद्धी मिळवून देतात. तुमची अभिनय क्षमता घराघरात पोहोचवण्याचे काम या मालिका करत असतात. तुमच्या कामाची पावती सुद्धा तुम्हाला लगेचच दिली जाते. त्यामुळे कश्यप पुन्हा एकदा मालिकेकडे वळला. मन उधाण वाऱ्याचे या मालिकेनंतर कश्यपने बऱ्याच नावाजलेल्या प्रोजेक्ट मध्ये काम केले.
बुगडी माझी सांडली गं, तप्तपदी, वास्तुरहस्य, पानिपत, जय भवानी जय शिवाजी अशा मोजक्या चित्रपट आणि मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण म्हणावे तसे यश त्याला मिळत नव्हते. जेव्हा श्रुती मराठेने त्याला नवा गडी नवं राज्य मालिकेच्या मुख्य भूमिकेसाठी विचारले तेव्हा कश्यपने लगेचच आपला होकार कळवला. खरं तर मन उधाण वाऱ्याचे मालिकेनंतर त्याला या मालिकेमुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आणले. आपल्या कामाची पावती देखील राघवच्या भूमिकेने त्याला मिळवून दिली आहे.