Breaking News
Home / ठळक बातम्या / पुण्यातील मराठी अभिनेत्रीचे अपघातात दुःखद निधन….
ishwari deshpande
ishwari deshpande

पुण्यातील मराठी अभिनेत्रीचे अपघातात दुःखद निधन….

पुण्यातील तरुण आणि एक तरुणी गोव्यात कार अपघातात मरण पावले आहेत. ही तरुणी मराठी तसेच हिंदी सृष्टीत कार्यरत होती. काही दिवसांपूर्वीच तिने चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले होते. आपल्या मित्रासोबत ती गोव्याला गेली होती. गोव्यातील अंजुना बिचकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि यातच त्यांचे निधन झाल्याची बाब समोर येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की..

ishwari deshpande
ishwari deshpande

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे ही तिचा मित्र शुभम देडगे याच्यासोबत गोव्याला गेली होती. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अंजुना बिचकडे जात असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. पार्क रिव्हर हॉटेल जवळ एक खाडी आहे सुरुवातीला त्यांची भरधाव वेगात असलेली गाडी नियंत्रण सुटून एका झाडाला जोरदार धडकली. त्यानंतर त्यांची गाडी ५० ते ६० मीटर पलटी होत तिथल्या खाडीत कोसळली. ही माहिती घटनास्थळी असलेल्या लोकांनी ताबडतोब अग्निशमन दलाला दिली. काही वेळात या जवानांनी गाडीचे लॉक तोडून त्या दोघांना बाहेर काढले. पहाटे पाच वाजता घडलेल्या या घटनेत ईश्वरी मदतीसाठी ओरडली होती असे उपस्थितांनी सांगितले होते मात्र मदत मिळण्या आधीच ईश्वरीचा मृत्यू झाला होता.

actor ishwari deshpande
actor ishwari deshpande

ईश्वरी देशपांडे (वय २५) ही पुण्यातील सुस परिसरात वास्तव्यास आहे तर तिच्यासोबत असलेला तिचा मित्र शुभम देडगे (वय २८) हा नांदेड सिटी परिसरात राहतो. हे दोघेही काही महिन्यात लग्न करणार होते अशी माहिती आता समोर येत आहे. पुढच्याच महिन्यात त्या दोघांनी साखरपुडा करण्याचे ठरवले होते आणि त्यानंतर ते लग्नही करणार होते. ईश्वरी आणि शुभम दोघेही कित्येक वर्षांपासून एकमेकांना चांगले ओळखत होते. ईश्वरीने मराठी सृष्टीत काही म्युजिक व्हिडिओत काम केले आहे. तर काही ब्रॅण्डसाठी तिने मॉडेलिंगही केलं आहे. मराठी सोबतच हिंदी सृष्टीतूनही तिला अभिनयाची संधी मिळाली होती. नुकतेच तिने काही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले होते तर काही प्रोजेक्टचे काम थोडेसे अपूर्ण राहिले होते. हे प्रोजेक्ट पूर्ण होण्या अगोदरच आणि चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या भीषण अपघातात ईश्वरीचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.