आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे प्रसिद्धी मिळवलेले अभिजित बिचुकले आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहेत. अभिजित बिचुकले हे राजकारणी म्हणून ओळखले जातात मूळच्या साताऱ्या जिल्ह्यातील बिचुकले यांनी नगरसेवक असो वा भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपतीचे पद मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. मात्र अशा कोणत्याही निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. कवी मनाचे नेते असे स्वतःला म्हणवून घेणाऱ्या बिचुकले यांची प्रचारा दरम्यान पोस्टरबाजी देखील तितकीच हटके असायची. लोकसभा निवडणुकीत एक अनामिक रक्कम भरावी लागत होती त्यावेळी बिचुकले यांनी अनामत रक्कम म्हणून १२ हजार ५०० रुपयांची चिल्लर जिल्हाधिकाऱ्याकडे जमा केली होती.
याच कारणामुळे बिग बॉसच्या घरात ते स्पर्धक बनून आले होते. मराठी बिग बॉसच्या सिजन २ मध्ये बिचुकले यांनी पार्टीसिपेट केले होते त्यावेळी त्यांच्या बेताल बोलण्याने प्रेक्षकांचे आणखी मनोरंजन झाले होते.अभिजित बिचुकले पुण्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत त्यानिमित्ताने त्यांचे बिग बॉसच्या स्पर्धकांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. पुण्यातील मंडई जवळ त्यांनी हा नवा व्यवसाय सुरू केला आहे. मंडई जवळील शारदा गणपती मंदिर येथे त्यांनी सातारच्या प्रसिद्ध अशा कंदी पेढ्यांचे दुकान सुरू केले आहे. त्यामुळे पुण्यातील मंडळींना आता सातारचे कंदी पेढे चाखता येणार आहेत. अभिजित बिचुकले राजकारणात जरी असले तरी त्यांचा हळवा कोपरा बिग बॉसच्या घरात सर्वांनी अनुभवला होता. त्यांच्या या व्यवसायाला यश मिळो आणि त्याची भरभराटी होवो हीच एक सदिच्छा…