अभिनेता संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम यांचा विवाहसोहळा २२ एप्रिल रोजी थाटात पार पडला. या लग्नाला दुहेरी मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली होती. पुण्यातील शिरगाव प्रतिशिर्डी मंदिरात त्यांचे लग्न पार पडले होते. निवेदिता सराफ संकेतला मुलाप्रमाणेच मानतात. दुहेरी मालिकेतून त्यांचे बॉंडिंग जुळून आले होते. संकेत हा खूप चांगला मुलगा आहे असे निवेदिता कौतूक करताना म्हणतात. संकेत आणि सुपर्णाच्या जुळून आलेल्या प्रेमाची खबर मालिकेच्या सेटवर सगळ्यांना लागली होती. दोघांच्या प्रेमाचे साक्षीदार निवेदिता सराफ आहेत. संकेतला दुहेरी मालिका मिळाली तेव्हा त्याचे मराठी पाहून मिवेदिता सराफ यांना मोठा प्रश्न पडला होता.
संकेत हा मूळचा नाशिकचा, मात्र तो इंदोरच्या जवळ असल्याने आणि हिंदीतूनच बोलत असल्याने त्याला मराठी बोलायला जड जात होती. इंदोरला क्लासेस घेत असल्याने त्याला हिंदीतूनच बोलावे लागत होते. पण त्याचा मराठी बोलण्याचा प्रयत्न आणि काम करण्याची जिद्द पाहून निवेदिता सराफ निश्चिंत झाल्या होत्या. स्वतःला इंप्रूव करत तो इतर कलाकारांचे काम करायचा. त्याने स्वतःच्या कामात सुधारणा घडवून आणली होती, हे पाहून मला त्याच्याबद्दल खूप आत्मीयता निर्माण झाली असे निवेदिता म्हणतात. याच मालिकेत काम करत असताना संकेतचे वडील खूप आजारी पडले. वडिलांच्या पश्चात बहीण आणि आईची जबाबदारी आपल्यावर आलीये याची जाणीव त्याला अगोदरच झालेली होती. संकेत त्यामुळे खूप जबाबदारीने वागत होता.
एवढेच नाही तर काही दिवसातच काकांचे निधन झाल्यावर सर्वात मोठा भाऊ या नात्याने चुलत भावंडालाही जवळ करताना दिसला. त्याचा संघर्ष पाहून मला त्याचा खूपच हेवा वाटत होता. सुपर्णाने देखील त्याच्या कुटुंबियांना खूप जवळ केले होते. त्याची चुलत भावंडे सुपर्णाला हक्काने फोन करतात हा तिच्यामधला गुण मला खूप चांगला वाटतो. संकेत वरवर खूप मस्तीखोर वाटतो मात्र त्याच्या आत दडलेला जबाबदार संकेत मी पाहिलेला आहे. मालिकेमुळे एकत्र काम करत असताना आम्ही आजही आमचं रील नातं जपून ठेवून आहोत. आम्ही एकमेकांच्या नेहमीच संपर्कात राहत आलो आहोत, कोणालाच आम्ही वेगळं असं समजलं नाही. संकेतचे वडील नाटक कधीही पाहायला जात नव्हते, मात्र वाडा चिरेबंदी नाटकाला त्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. त्यांच्या कुटुंबियांसोबत आमचे छान सूर जुळले आहेत.