Breaking News
Home / मराठी तडका / अरुण सरनाईक यांचे शेवटचे ते शब्द अजूनही आठवतात
arun sarsanik legendary actor
arun sarsanik legendary actor

अरुण सरनाईक यांचे शेवटचे ते शब्द अजूनही आठवतात

मिलिंद गवळी हे मराठी चित्रपट सृष्टीचे एकेकाळी नायक म्हणून ओळखले जात होते. आताही त्यांच्या वाट्याला स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका नायक म्हणून विरोधी भूमिका वाट्याला आली आहे. त्यामुळे त्यांना कित्येकदा प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. पण एक उत्तम अभिनेता म्हणूनच त्यांना ही पावती दिली जाते हे वेगळं सांगायला नको. अभिनयाच्या कारकिर्दीत मिलिंद गवळी यांनी आजवर अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेलं आहे. यातूनच त्यांनी हिंदी चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या प्रवासातल्या आठवणी सांगताना त्यांनी अरुण सरनाईक यांच्या सोबतचा एक किस्सा सांगितला.

arun sarsanik legendary actor
arun sarsanik legendary actor

अरुण सरनाईक यांचे अपघातात निधन झाले होते, त्यात पत्नी आणि मुलाचेही निधन झाले होते. मिलिंद गवळी हा भावुक क्षण आठवताना म्हणतात की, गायक नितीन मुकेश यांनी माझ्या पहिल्या चित्रपटासाठी माझ्यासाठी पार्श्वगायन केलं होतं. चित्रपटाचे नाव होतं “वक्त से पहले” या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं गोविंद सरय्या यांनी. गोविंद सरय्या म्हणजे ज्यांनी नूतनचा golden jubilee सिनेमा सरस्वतीचंद्र दिग्दर्शित केला होता. चित्रपटाची नायिका होती जयंत सावरकर यांची कन्या सुपर्णा, या चित्रपटांत पल्लवी जोशी आणि निवेदिता सराफ सुद्धा नायिकेसाठी consider केल्या होत्या. वक्त से पहले चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटांमध्ये मराठीचे दिग्गज हिरो “अरुण सरनाईक” हे सुद्धा काम करत होते. लहानपणापासून त्यांना बघत बघत आम्ही मोठे झालो होतो.

arun sarnaik milind gawali
arun sarnaik milind gawali

“पप्पा सांगा कोणाचे मम्मी सांगा कोणाची” त्यांनी गायलेलं प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्यासह हे गाणं अजूनही तितकच मधुर आणि फ्रेश nostalgic वाटतं. काल तेजाब मधलं नितीन मुकेश यांचं गाणं कानावर पडलं आणि वक्त से पहलेचे दिवस आठवले. नितीन मुकेश आठवला, अरुण सरनाईक आठवले, गोविंद सरय आठवले. अरुण सरनाईकांचे १६ जून १९८४ चे त्यांचे शब्द आठवले की “राजा पुढच्या आठवड्यात कोल्हापूर वरून मुंबईत येणार आहे, तेव्हा मी तुझ्या घरी नक्की येतो.” आणि २१ जूनला पंढरीची वारी शूटिंग करण्यासाठी कोल्हापूर वरून पुण्याला येत असताना त्यांच्या गाडीचा एक्सीडेंट झाला, ज्यात त्यांची पत्नी आणि मुलगा गेले. आयुष्यामध्ये फक्त आठवणी मागे राहतात. आपण जुनी गाणी ऐकतो, तेव्हा गाण्याबरोबर अनेक आठवणी जाग्या होतात.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.