Breaking News
Home / जरा हटके / अभिनेत्याला मारायचा सीन होता त्यानंतर त्याचे अपघातात निधन झाले.. ४४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे नाना आजही आहेत दुखी
nana patekar jairam hardikar
nana patekar jairam hardikar

अभिनेत्याला मारायचा सीन होता त्यानंतर त्याचे अपघातात निधन झाले.. ४४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे नाना आजही आहेत दुखी

जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन हा मराठी चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला होता. अरुण सरनाईक, श्रीराम लागू, रिमा लागू, निळू फुले, जयराम हार्डीकर, नाना पाटेकर, श्रीकांत मोघे, मधुकर तोरडमल अशी मातब्बर कलाकार मंडळी चित्रपटाला लाभली होती. राजकारणाचे सिंहासन मिळवण्यासाठी राजकारण्यांची जी धडपड चित्रपटात दाखवली, ती आजवर कोणत्याही चित्रपटाने दाखवली नसावी. त्याचमुळे हा चित्रपट मराठी सृष्टीतील मैलाचा दगड ठरला होता. काल या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ४४ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक सोहळा आयोजित करण्यात आला.

nana patekar jairam hardikar
nana patekar jairam hardikar

नाना पाटेकर, जब्बार पटेल, मोहन आगाशे यांनी यावेळी चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. चित्रपटाचे साक्षीदार आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे देखील उपस्थित होते, तर सुप्रिया सुळे यांनाही मंचावर आमंत्रित केले. जब्बार पटेल सिंहासन चित्रपटाची आठवण सांगताना म्हणतात की, सिंहासन चित्रपट माईल स्टोन ठरला. कित्येक आठवडे हा चित्रपट हाऊसफुल्ल गर्दी करणारा ठरला होता. नाना पाटेकर यांनी यावेळी इथे एका दुःखद प्रसंगाची आठवण करून दिली. नाना पाटेकर यांना या चित्रपटासाठी त्यावेळी ३ हजार रुपये मिळाले होते. त्यावेळी १०० रुपयांत माझ्या संपूर्ण कुटुंबाच एक महिन्याचं राशन मिळत होतं. चित्रपटात त्यांना जयराम हार्डीकर यांना मारायचे होते.

nana patekar jairam hardikar family
nana patekar jairam hardikar family

सिंहासन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी जयराम हार्डीकर नाटकानिमित्त दौऱ्यावर गेले होते. मुंबईला परतत असताना त्यांच्या नाटकाच्या बसला आग लागते. यातच त्यांचा होरपळून मृत्यू होतो. पण जयराम हार्डीकर यांना मी मारल्यामुळे त्यांच्या पत्नी माझ्याशी कित्येक वर्षे बोलत नव्हत्या. त्यांचे म्हणणे होते की, मी त्यांना मारल्यामुळे अपशकुन झाला. मी चित्रपटात मारल्यामुळेच त्यांचे निधन झाले असे त्या कित्येक वर्षे म्हणत होत्या. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांची माझ्याशी भेट घडून आली, आम्ही छान बोललो सुद्धा. पण हा चित्रपट केल्यानंतर मला अनेक चित्रपट मिळत गेले. अशी आठवण नाना पाटेकर यावेळी करून देतात.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.