स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा या मालिकेने तीन वर्षांहून अधिक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकताच या मालिकेचा १००० वा भाग शूट करण्यात आले. यावेळी कलाकारांनी हा आनंदाचा क्षण सेटवर एकत्र साजरा केलेला पाहायला मिळाला. दीपा आणि कार्तिकच्या लव्ह स्टोरीपासून झालेली मालिकेची सुरुवात आता एका वेगळ्या वळणावर येउन पोहोचली आहे. मालिकेने अनेक वर्षांचा लीप घेतला असल्याने दीपिका आणि कार्तिकीच्या देखील प्रेमाची गोष्ट मालिकेत तुम्हाला पाहायला मिळत आहे. मालिकेच्या लीपमुळे प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक बदल घडून आले. इकडे कार्तिक दीपा विषयीची अढी मनात बाळगून असतानाच कार्तिकी देखील दिपाचा द्वेष करते.
विरोधी भूमिकेमुळे आता त्यांच्या आयुष्यात आणखी एक वादळ येणार आहे. इतके दिवस मालिकेतून बाहेर पडलेली आयेशा पुन्हा दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात येणार असल्याने मालिकेला एक धक्कादायक ट्विस्ट मिळणार आहे. यात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे कार्तिकी आणि दीपिकाच्या आयुष्यात आलेला आर्यन देखील त्याचे रंग दाखवायला सुरुवात करणार आहे. कार्तिकीला आपल्या प्रेमाची भुरळ घालणारा आर्यन दुसरा तिसरा कोणी नसून ती आयेशाचा भाचा आहे. आपल्या मावशीची झालेली ही अवस्था पाहून आर्यन त्याचा बदला घेण्यासाठी इनामदार कुटुंबात वादळ बनून येणार आहे. आयेशा कार्तिकच्या प्रेमात वेडी झालेली आहे. तिच्या या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या कार्तिक आणि दिपावर तो सूड उगवणार आहे. मुळात आर्यन याच उद्देशाने कार्तिकीच्या प्रेमात पडल्याचे नाटक करतो आहे.
आर्यन आणि आयेशा दोघेही मिळून आता इनामदार कुटुंबाला बरबाद करण्याचा घाट घालत आहेत. मालिकेतला हा ट्विस्ट मात्र प्रेक्षकांना चक्रावून सोडणारा आहे. जिथे या खलनायिका माहीत असतानाही त्या पुन्हा पुन्हा दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात वादळ आणताना दिसत आहेत. ही गोष्ट मात्र मनाला न पटणारी आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा असे ट्विस्ट आणून मालिका का भरकटवली जाते याचा विचार लेखकाने करायला हवा असे मत प्रेक्षकांकडून व्यक्त होत आहे. एकदा सकारात्मक बदल घडवून ही मालिका संपवावी अशी प्रेक्षक अपेक्षा करत असतानाच असे ट्विस्ट आणून ही मालिका वाढवत राहण्यावर भर दिला जात आहे. पण याला सर्वस्वी प्रेक्षकही तेवढेच जबाबदार आहेत, कारण आजही ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये टॉप तीन मध्ये स्थान टिकवून आहे.