हिंदी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच शिव ठाकरेचे नशीब चांगलेच फळफळले आहे. लवकरच शिव आता एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोबतच खतरों के खिलाडी रिऍलिटी शोमध्येही त्याला आमंत्रीत केले जाणार आहे. शिव ठाकरे हिंदी बिग बॉसच्या १६ सिजनचा विजेता झाला नसला तरीही मोठी प्रसिद्धी मिळवत आहे. त्यामुळे शिव ठाकरे सध्या यशाच्या शिखरावर असलेला पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच शिवने ब्रँड न्यू चार चाकी वाहनाची खरेदी केली होती. दोन सेकंड हॅन्ड गाड्यानंतर त्याने स्वतःची नवी कोरी गाडी खरेदी केल्याचा आनंद मिडियासोबत शेअर केला होता.
अमरावतीला गेल्यानंतर आईच्या हातून माझ्या नविन गाडीची पूजा करणार असे तो त्यावेळी म्हणाला होता. गाडी खरेदीनंतर शिव ठाकरेने आणखी एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नुकतेच शिवने हॉटेल व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे. ठाकरेज चाय अँड स्नॅक्स असे त्याच्या नव्या व्यवसायाचे नाव आहे. हसलर्स हॉस्पिटॅलिटी इंडिया यांच्या सहाय्याने शिव ठाकरे याने व्यवसाय क्षेत्रात स्वतःच्या नावाचा ब्रँड आणला आहे. मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांनाही परवडेल असा व्यवसाय करावा. अशी कल्पना हसलर्सचे सर्वेसर्वा कृनाल ओझा शिव ठाकरेकडे घेऊन आले. शिवने देखील त्यांच्या प्रस्तावाला विचारपूर्वक होकार कळवला. ज्यांना अभ्यास करताना काम करताना थकवा जाणवेल त्यांनी ठाकरेज चहा प्यायला या.
मीडियाशी बोलताना शिवने अशी जाहिरात देखील केली आहे. गोरेगाव पश्चिम मुंबई येथील किया शोरूमच्या वर शिवच्या नावाने हे कॅफे सुरू करण्यात आले. कॅफेच्या उदघाटनावेळी अभिनेत्री तेजश्री जाधव हिने आवर्जून उपस्थिती लावली होती. ठाकरेज चाय अँड स्नॅक्स कॅफेमध्ये २५ हुन अधिक चहा आणि स्नॅक्सच्या व्हरायटी पाहायला मिळतील. कृनाल ओझा हे हॉटेल व्यावसायिक आहेत. सेलिब्रिटींच्या नावाने कॅफे सुरू झालेला शिव हा दुसरा सेलेब्रिटी आहे ज्याच्यासोबत ओझा यांनी बिजनेस पार्टनरशिप केली आहे. याअगोदर अब्दु रोजीकला घेऊन त्यांनी त्याच्या नावाने बर्गर बाजारात आणला होता. त्यामुळे शिव ठाकरेची व्यवसाय क्षेत्रातली ही इनिंग त्याला नक्कीच गगनभरारी घ्यायला कामी येईल.