स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेने जवळपास तीन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याने गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका टॉप २ च्या यादीत स्थान टिकवून आहे. मालिकेने तब्बल १४ वर्षांचा लीप घेतलेला असल्याने मालिकेत अनेक बदल घडून आलेले दिसतात. दिपाने कार्तिकच्या विरोधात कोर्टात आवाज उठवल्यानंतर तो शिक्षा भोगून पुन्हा घरी परतला आहे. दिपाने आपल्याला एवढी मोठी शिक्षा दिली आता तिला याचे फळ भोगावे लागणार. असे म्हणत कार्तिक दिपाचा बदला घेणार असे दाखवण्यात आले आहे. तर कार्तिकी दिपाच्या पूर्णपणे विरोधात गेली आहे.
कार्तिकी आणि दीपिका आता कॉलेजमध्ये जायला लागल्या आहेत. या भूमिका अनुष्का पिम्पुटकर आणि तनिष्का विशे निभावत आहेत. तर आदित्यच्या भूमिकेत अभिनेता भाग्येश पाटील झळकत आहे. लवकरच मालिकेत कार्तिकीचा बॉयफ्रेंड आर्यनची डॅशिंग एन्ट्री होत आहे. आर्यन कार्तिकी सोबत कॉलेजमध्ये शिकायला असतो. ही भूमिका अभिनेता मेघन जाधव साकारणार आहे. हिंदी मालिका सृष्टी गाजवल्यानंतर मेघन जाधव मराठी मालिकेकडे वळला आहे. मेघन याने आपल्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. जय श्री कृष्णा, सलाम बच्चे, शुभारंभ, मूहबोली शादी, रझिया सुलतान. सावधान इंडिया अशा अनेक मालिकेतून मेघन जाधव महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला आहे. मेघन हा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध आभिनेता मंदार जाधवचा भाऊ आहे.
मंदार सध्या स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीपची भूमिका गाजवत आहे. मंदारने देखील आपल्या करिअरच्या सुरुवातीला हिंदी मालिकांमधून काम केले होते. अलादिन, वीर शिवाजी, प्यार का दर्द है, बिट्टो, रजिया सुलतान, से सलाम इंडिया अशा चित्रपट मालिकेतून तो झळकला. श्री गुरुदेवदत्त मालिकेतून त्याने मराठी सृष्टीत पदार्पण केले होते. महेश कोठारे यांच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून मंदार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. भावाच्या पावलावर पाऊल टाकत मेघन देखील मराठी सृष्टीत येण्याचा प्रयत्न करत आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तो आर्यनची भूमिका साकारत आहे. कार्तिकी आणि आर्यनची केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल असा विश्वास आहे. या भूमिकेसाठी मेघन जाधवचे अभिनंदन आणि शुभेच्छा.