Breaking News
Home / मराठी तडका / मराठी मालिका सृष्टीतील अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्नसोहळा.. मालिकेच्या कलाकारांनी लावली हजेरी

मराठी मालिका सृष्टीतील अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्नसोहळा.. मालिकेच्या कलाकारांनी लावली हजेरी

सध्या सेलिब्रिटी विश्वात लग्नाची धामधूम सुरू आहे. काही सेलिब्रिटी साखरपुडा तर काही सेलिब्रिटी लग्नाच्या बोहल्यावर चढत आहेत. काल शुक्रवारी १७ मार्च २०२३ रोजी  मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आकाश नलावडे आणि रुचिका धुरी यांच्या लग्नाचा सोहळा अगदी थाटात पार पडला. आकाश आणि रुचिका यांच्या लग्नाला सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. साधारण पाच दिवसांपूर्वीच मालिकेच्या कलाकारांनी आकाश आणि रुचीकाचे केळवण साजरे केले होते. त्यावरून हे दोघेही लवकरच विवाहबद्ध होणार असे समजले होते. आकाश नलावडे हा मराठी मालिका अभिनेता आहे. त्याने ललित कला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले होते.

pashya marriage sukh mhanje nakki kay asta
pashya marriage sukh mhanje nakki kay asta

नाटक एकांकिका करत असताना आकाशला मालिकेत झळकण्याची संधी मिळत गेली. मालिका सृष्टीत तो गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. छोट्या छोट्या भूमिका साकारणाऱ्या आकाशला सहकुटुंब सहपरिवार मालिकेने खरी प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत तो पश्याची भूमिका साकारत आहे. पश्या आणि अंजीची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. दोघांचा साधा भोळेपणा आणि त्यातून उडणारी धमाल प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ठरली. मालिकेतून पश्या जेव्हा गायब झाला तेव्हा प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. मात्र हा पश्या जिवंत आहे आणि अंजीला गुपचूप भेटतो हे अजून कोणालाही समजलेले नाही. त्यामुळे त्यांचा हा लपवाछपवीचा खेळ आता त्यांनी केलेल्या गोंधळामुळेच उघडकीस येणार अशी खात्री प्रेक्षकांना आहे.

akash nalawade ruchika dhuri

मात्र या दोघांची उडणारी ही धमाल पाहून प्रेक्षक देखील खुश होत आहेत. काही महिन्यांपूर्वी आकाश आणि रुचिकाचा साखरपुडा संपन्न झाला होता. त्यानंतर आकाशच्या लग्नाची पत्रिका प्रसारित करण्यात आली  होती. मात्र त्यावेळी त्याने लग्नाची तारीख जाहीर करणे आवर्जून टाळले होते. तूर्तास काल पार पडलेल्या आकाशच्या लग्नाला मराठी सेलिब्रिटी विश्वातून साक्षी महेश, नंदिता धुरी, भाग्यश्री पवार, सुनील बर्वे, पूजा पुरंदरे, निमिष कुलकर्णी, आकाश शिंदे या सर्वांनी उपस्थिती लावली. मात्र किशोरी अंबिये, कोमल कुंभार हे सेलिब्रिटी लग्नाला अनुपस्थित राहिलेले दिसले. मात्र मीडियाच्या माध्यमातून या दोघींनी आकाश आणि रुचिका या नवविवाहित दाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.