बाहुबली चित्रपटामुळे राणा दग्गुबती हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. खरं तर ही भुमीका खलनायकी ढंगाची जरी असली तरी नायकाच्या तोडीसतोड होती. त्यामुळे चित्रपटातील नायक इतकाच खलनायक देखील खूप चर्चेत आला होता. राणा दग्गुबती दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता असला तरी २०११ सालच्या दम मारो दम या बॉलिवूड चित्रपटातून त्यांने हिंदी सृष्टीत पदार्पण केले होते. पण त्याला खरी ओळख मिळवून दिली ती बाहुबली चित्रपटाने. राणा दग्गुबती हा गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या संकटांशी सामना करत आहे. अभिनय क्षेत्रात यश मिळवलेल्या राणाने २०१६ साली आपल्या खाजगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला होता.
राणा म्हणाला की, मला उजव्या डोळ्याने अजिबात दिसत नाही. हैदराबाद येथील एलवी प्रसाद हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डोळ्यांवर शस्रक्रिया करण्यात आली होती. कॉर्नियल ट्रांसप्लांट ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली त्यावेळी ते १४ वर्षांचे होते. मात्र ही शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्यांना उजव्या डोळ्याने अजिबात दिसत नव्हते. आजही त्यांचा उजवा डोळा अधू आहे, असे ते मुलाखतीत सांगतात. एका छोट्याशा मुलाने आपल्या आईला दिसत नाही अशी तक्रार राणाकडे केली होती. त्यावेळी तो लहान मुलगा खूप खचून गेला होता. तेव्हा राणाने त्या मुलाचे सांत्वन करत आपल्यालाही एका डोळ्याने दिसत नसल्याचे सांगितले होते. मात्र या गोष्टींमुळे मी कधीच खचलो नाही. या गोष्टीचा माझ्या कुठल्याच कामात अडथळा देखील येत नाही असे समजावत त्या मुलाला बळ दिले होते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून राणा दग्गुबतीवर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. काही वर्षांपूर्वी राणा दग्गुबती यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. यात त्यांचे शरीर खूपच किरकोळ दिसत होते. तेव्हा हा फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. प्रकृती खालावल्यामुळे राणा दग्गुबती यांच्याबाबत काळजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र हा एका चित्रपटाचा लूक आहे असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र याबाबत नुकतेच राणा दग्गुबती यांनी एका मुलाखतीत खुलासा केला. माझ्यावर किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले असल्याचे सांगितले. म्हणून मला असं वाटतं की मी जवळपास चित्रपटातील टर्मिनेटर झालो आहे. मी कायम हाच विचार करतो की ‘चलो, मैं अभी भी जिंदा हूं और तुम्हें बस चलते रहना है.’