Breaking News
Home / जरा हटके / सेक्सि व्हिडीओ सेंड कर.. म्हणणाऱ्या युजरला मराठी अभिनेत्रीची चपराक

सेक्सि व्हिडीओ सेंड कर.. म्हणणाऱ्या युजरला मराठी अभिनेत्रीची चपराक

सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी घडत असतात. या माध्यमातून फसवणूकीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मराठी मालिका अभिनेत्रीबाबतही अशा गोष्टी अनेकदा घडल्या आहेत. मेसेजेसच्या माध्यमातून काही मानसिक विकृत व्यक्ती अश्लील फोटो आणि व्हिडिओजची मागणी करत असतात. मुलींना तर अशा गोष्टींचा अनेकदा सामना करावा लागला आहे. असाच काहीसा अनुभव मालिका अभिनेत्रीने घेतला आहे. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली ३६ गुणी जोडी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील अभिनेत्री सुरभी भावे हिला गेल्या काही दिवसांपासून एक व्यक्ती त्रास देत आहे.

surabhi bhave
surabhi bhave

हा व्यक्ती सुरभिला मेसेजेस करून अश्लील व्हिडीओ सेक्सि फोटोंची मागणी करत आहे. मात्र सुरुवातीला विकृत व्यक्ती म्हणून सुरभिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर हा व्यक्ती अश्लील व्हिडीओ तीला मेसेज करू लागला. अश्लील भाषेत तिच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करू लागला. त्यामुळे या व्यक्तीला असेच सोडले तर हा व्यक्ती अजून त्रास देईल म्हणून सुरभिने त्याचा चोख समाचार घेण्याचा निर्णय घेतला. जो व्यक्ती सुरभिला त्रास देत होता त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करत सुरभिने त्याने केलेले मेसेजेस सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच त्याचा खरपूस समाचार घेत सोशल मीडियावर अशा व्यक्तींना उघडं नागडा केलं जाईल अशी चपराकच लावली आहे. जेणेकरून अजून कोणीही अशी मागणी आणि असे कृत्य पुढे करणार नाही.

surabhi bhave pavankhind movie
surabhi bhave pavankhind movie

सुरभीची ही पोस्ट सध्या सेलिब्रिटी विश्वात चांगलीच चर्चेत आली आहे आणि त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत अशा व्यक्तीची चांगलीच कानउघडणी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये सुरभी म्हणते की, ह्या sudhirtakalkar ह्यांनी मला अनेकवेळा अश्लील विडिओ पाठवले पण मी सतत दुर्लक्ष केले पण ह्या दोन दिवसांत पुन्हा पाठवले मग मी रिप्लाय दिला ,जो रिप्लाय दिला तो सुद्धा ह्यात आहे. त्यांच्या आईचा ह्यात अवमान करणे हा उद्देश नव्हता पण त्यांना झोंबल ते. अशा समस्त पुरुष वर्गाला सांगते,” तुमची आई बहिण ही स्त्री आणि बाकी बायका काय तुमच्या मालकीच्या असतात का. नीच लोकहो?” इथून पुढे असे मेसेजेस केले तर प्रत्येकाला असंच स्क्रीनशॉट पोस्ट करून सामाजिक नागडा केले जाईल ह्याची नोंद घ्यावी. P. S. ह्याहून मला सभ्य भाषा वापरता येत नाही.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.