Breaking News
Home / जरा हटके / हिंदी चित्रपटात श्रीमंत नायक नायिकेचा बाप अशी ओळख मिळवलेले मराठमोळे अभिनेते
gajanan jagirdar
gajanan jagirdar

हिंदी चित्रपटात श्रीमंत नायक नायिकेचा बाप अशी ओळख मिळवलेले मराठमोळे अभिनेते

​हिंदी चित्रपटातून नायक नायिकेचा श्रीमंत बाप कोणी वठवला असेल, तर तो मराठमोळ्या गजानन जागिरदार यांनी. पिळदार मिश्या, डोळ्यांवर चष्मा आणि अंगातला कोट यामुळे गजानन जागिरदार हे हिंदी चित्रपटातून रुबाबदार बाप म्हणून परिचयाचे बनले होते. मै चूप रहुंगी या चित्रपटात त्यांनी मीना कुमारीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. अशा अनेक भूमिकांसाठी गजानन जागिरदार यांनी मराठी हिंदी चित्रपटातून ओळख बनवली होती. बालकलाकार ते चरित्र अभिनेत्याच्या भूमिका या त्यांच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेऊयात. गजानन जागिरदार यांचा २ एप्रिल १९०७ रोजी अमरावती येथे जन्म झाला.

gajanan jagirdar
gajanan jagirdar

जागिरदार यांना नाटकाची आवड होती. बालपणापासूनच ते नाटकातून काम करत असत मात्र घरातून विरोध होऊ लागल्याने पुढे जाऊन त्यांनी घर सोडले. नाटकासाठी मी घर सोडले अशी एक चिठ्ठी त्यांनी वडिलांना लिहिली होती. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळावे या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. १९३० साली त्यांनी आपल्या मित्रांसोबत नाटक सोडून दांडी यात्रेत सहभाग दर्शवण्याचे ठरवले. मात्र भयंकर तापामुळे गजानन जागिरदार झोपून राहिले. त्यानंतर आपले सगळे मित्र दांडी यात्रेत सहभागी झाल्याचे त्यांना कळले. यानंतर त्यांना वासुदेव यांनी आपल्या शाळेत शिक्षकाची नोकरी देऊ केली. त्यावेळी कोल्हापूर येथे चित्रपटाचे काम होत असे, त्यामुळे त्यांनी अभिनयाच्या दृष्टीने काही काळासाठी शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

gajanan jagirdar lokmanya tilak
gajanan jagirdar lokmanya tilak

आपला मुलगा मार्गी लागला म्हणून त्यांच्या वडिलांनाही आनंद झाला. पुढे कोल्हापुला गेल्यावर जागिरदार यांची व्ही शांताराम यांच्याशी मैत्री झाली. प्रभात फिल्म्स कंपनीत त्यांना दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. रामशास्त्री हा प्रभातचा त्याकाळी गाजलेला ऐतिहासिक चित्रपट. याचे दिग्दर्शन गजानन जागिरदार यांनी केले. पायाची​​ दासी, सिंहासन, वसंतसेना अशा मराठी तसेच मिठा जहर, तलाक, फरीशता अशा हिंदी चित्रपटातून त्यांनी कधी अभिनय तर कधी दिग्दर्शन केले. प्रभातच्या एका चित्रपटात जागीरदार यांनी लोकमान्य टिळकांची व्यक्तिरेखा साकारली. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या वेशातील जागिरदारांचा एक फोटो लोकमान्य यांचाच आहे आहे असा समज रुजला.

दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित महात्मा चित्रपटात जागिरदार मुख्य भूमिकेत झळकले होते. या व्यक्तिरेखेचे बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्र काढले होते. १९८१ च्या उमराव जान चित्रपटात जागिरदार यांनी मौलवीची भूमिका गाजवली होती. १९८८ साली दूरदर्शनवरील स्वामी या मराठी मालिकेचे त्यांनी दिग्दर्शन केले. ही त्यांची मालिका खूप लोकप्रिय ठरली होती. १३ ऑगस्ट १९८८ रोजी गजानन जागिरदार यांचे निधन झाले. दोन वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा अशोक जागिरदार यांनी त्यांची दुर्मिळ छायाचित्रे राष्ट्रीय चित्रपट संग्रहलायकडे सुपूर्द केली होती.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.