मराठी सृष्टीला अनेक हरहुन्नरी कलाकार लाभले त्यातीलच एक म्हणजे अभिनेता कैलाश वाघमारे. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाने कैलाशला मोठी लोकप्रियता मिळाली होती. नाटकाचे देशभर झालेल्या प्रयोगांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. कैलाश पुढे अनेक दर्जेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. भिरकीट, हाफ तिकीट, भिकारी, मनातल्या उन्हात, ड्राय डे, खिसा, सायकल, मयत, भाऊ, हिरवी अशा चित्रपटातून त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. तानाजी या बॉलिवूड चित्रपटाने कैलाशला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. या सर्व प्रवासात अनेक चढउतार अनुभवायला मिळाले.
मात्र एखाद्याच्या दिसण्यावरून किंवा त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तुमच्याशी कसं वागायचं हे ठरवलं जातं. तेव्हा ती गोष्ट मनाला चटका लावून जाणारी ठरते. आपला अभिनय लोकांना दिसत नाही का? अशी खंत नुकतीच त्याने व्यक्त केलेली आहे. कैलाशने एक मुलाखत दिली आहे यात तो दिलखुलासपणे बोलताना पाहायला मिळाला. आपल्या मालिका चित्रपटात काम देताना आधी कोणत्या नजरेतून तुम्हाला पाहिलं जातं यावर कैलाश म्हणतो की, मी तर भाषेच्या पलीकडे जाऊन बोलतो. काय होतं की, भाषा तुमची तेव्हा कळते जेव्हा तुम्ही तोंड उघडता. पण तोंड उघडण्याआधी तुम्हाला जज केलं जातं त्याचं काय करायचं. म्हणजे कैलाश वाघमारेला बघितल्याबरोबर कॅटॅगराईज केलं जातं की हा कुठल्यातरी विशिष्ट एका जात समूहाचा असणार आहे.
हा गावाकडचा असणार आहे. म्हणजे याला काही येतच नसणारे. हे जे कॅटॅगराईज करण्याचं आहे त्यानुसार तुम्हाला ट्रीट करणं इथून सुरू होतं. कैलाशला म्हणायचं आहे की आपल्या दिसण्यावरून आपल्याला नेहमी जज केलं गेलं. काही बोलण्यापूर्वीच तुमच्याबद्दल एक मत बनवलं जातं. भाषा तर खूप लांबची गोष्ट आहे. मात्र अशा परिस्थितीला तेवढताच हिमतीने तोंड द्यायला शिकलं पाहिजे. एकदा का अभिनय पाहिला की सगळे गप्प होतात. कैलाशचा प्रमुख भूमिका असलेला गाभ मराठी चित्रपट येत्या मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. घोडा हा त्याचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. कैलाशकडे समाज जीवणार भाष्य करणारे चित्रपट असतात, त्याचे चित्रपट याच कारणामुळे प्रेक्षकांना विशेष भावतात.
सर ज्यावेळेस नाटकात काम करत होता. (शिवाजी अंडरग्राउंड)तेव्हा पण तुम्ही स्टार होतात.
त्या वेळी तुमची स्वाक्षरी मागायला गेलो त्या वेळी अक्षरक्षः हाकलून लावलत आम्हाला.