Breaking News
Home / जरा हटके / त्यावेळी अनिकेत खूप लहान होता.. जवळ चाळीस हजार रुपये असतानाही मी काहीच करू शकलो नाही
ashok saraf nivedita aniket
ashok saraf nivedita aniket

त्यावेळी अनिकेत खूप लहान होता.. जवळ चाळीस हजार रुपये असतानाही मी काहीच करू शकलो नाही

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी सृष्टीतील एक लाडकं जोडपं म्हणून परिचयाचं आहे. या जोडीने मराठी सृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले. अशोक बरोबर एकत्र काम करताना निवेदिता त्यांच्या प्रेमातच पडल्या होत्या. स्वतः पुढाकार घेऊन निवेदिता यांनी अशोक सराफ यांना प्रेमाची कबुली दिली होती. अशोक सराफ यांच्याशी लग्न झाल्यानंतर निवेदिता यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. त्यानंतर मालिका, चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले. दरम्यान निवेदिता सराफ यांनी हंसगामीनी हा साड्यांचा ब्रँड सुरू केला त्याचबरोबर निर्मिती संस्था देखील उभारली होती.

ashok saraf nivedita aniket
ashok saraf nivedita aniket

मात्र एका घटनेत त्यांची निर्मिती संस्था बंद पडली. निवेदिता आणि अशोक सराफ यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा आहे. अनिकेत खूप लहान होता त्यावेळचा एक किस्सा अशोक सराफ यांच्यासाठी एक शिकवण देणारा ठरला होता. जवळ चाळीस हजार रुपये असूनही त्यावेळी ते काहीच करू शकत नव्हते. हा माझ्यासाठी एक धडाच होता याचा किस्सा अशोक सराफ यांनी आपल्या बहुरूपी पुस्तकात सांगितला आहे. एकदा कोल्हापूर येथे अंबाबाईच्या दर्शनाला ते गेले होते. तिथून पुन्हा ते मुंबईला ट्रेनने आले. त्यावेळी अनिकेत खूप लहान होता. त्याला खूप भूक लागली होती म्हणून तो रडत होता. आमच्याजवळ असलेले दूध नासले होते. म्हणून मग दूध आणण्यासाठी मी ट्रेनमधून खाली उतरलो.

ashok saraf aniket saraf
ashok saraf aniket saraf

ट्रेन सुटू नये याची भीती असतानाही पाच ट्रॅक ओलांडून मी स्टेशन बाहेर असलेल्या रस्त्यावर गेलो. पण कुठेच दुकान नसल्याने निराश होऊन परत आलो. त्यावेळी माझ्या खिशात ४० हजार रुपये होते पण ते पैसे काहीच कामाचे नव्हते. शेवटी अनिकेतला ग्लुकोज बिस्कीट पाण्यात बुडवून खाऊ घातले होते. पैसा म्हणजेच सर्वकाही नसतं हे त्यावेळी मला जाणवलं होतं. हा किस्सा आपल्याला एक धडा शिकवून गेला हे ते आवर्जून म्हणतात. अनिकेतच्या पालनपोषणानंतर निवेदिता यांनी चित्रपटातून पुन्हा एकदा पदार्पण केलं. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या भाग्य दिले तू मला मालिकेत त्या रत्नमालाची भूमिका साकारत आहेत. हे पात्र लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार अशी चर्चा सुरू आहे.

राज कावेरीच्या लग्नानंतर आपल्या आईला गंभीर आजार झालाय हे सगळ्यांना समजणार आहे. त्यामुळे मालिकेतून रत्नमाला एक्झिट घेणार असे बोलले जात आहे. मात्र हे पात्र एक्झिट घेत असेल तर मालिकेला काहीच अर्थ राहणार नाही अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. निवेदिता सराफ यांच्या रत्नमालाच्या भूमिकेवर प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी ही मालिका सोडू नये असे मत आता सोशल मीडियावर मांडले जात आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.