मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत चांगलीच चर्चेत येऊ लागली. आपण बिग बॉसच्या घरात असताना आदिल दुराणी दुसऱ्याच एका गर्लफ्रेंड सोबत फिरत होता. आपल्या आईच्या उपचारासाठी राखीने आदिलकडे दिलेले सर्व पैसे खर्च केले. त्याने माझ्या आईचा जीव घेतला असा आरोप राखीने तिचा पती आदिलवर लावला होता. यानंतर राखीने आदिल विरोधात पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्याने आपल्याला फसवलं, माझे पैसे परत देत नाही तनु चंदेल सोबत त्याचे अफेअर आहे या गोष्टी तिने तक्रारीत नोंदवल्या. त्यावेळी पोलिसांनी कारवाई करत आदिल दुराणीला अटक केली.
आदिलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याच्या विरोधात म्हैसूर येथील आणखी एका इराणी विद्यार्थिनीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आदिल झोपडपट्टीत राहतो, तो हॉटेलचा मालक नाही. तो म्हैसूरला राहतो आणि ड्रायव्हर म्हणून काम करतो. आदिलला टक्कल आहे असे अनेक धक्कादायक खुलासे राखीला आदिलबद्दल समजले. तेव्हा मी देवाचे आभार मानते की देवाने मला सद्बुद्धी दिली. यासर्वांपासून माझी देवाने सुटका केली. फक्त आदिल गरीब आहे एवढे जरी त्याने सांगितले असते तरी मी त्याला माफ केले असते असे राखीने म्हटले होते. मात्र आता मी माझ्या कामाकडे लक्ष्य केंद्रीत करणार आहे. लवकरच माझे एक गाणं सुद्धा तुमच्या भेटीला येणार असेही राखीने म्हटले होते. यानंतर राखी आता आपल्या व्यवसायाकडेही लक्ष्य देत आहे.
दुबई येथे राखी सावंतची एक संस्था आहे. नवख्या कलाकारांना अभिनय, नृत्य,मार्शल आर्टस्, योगा तसेच आणखी काही कलेचे धडे देत आहे. दुबईत अनेक विद्यार्थ्यांनी आणि प्रशिक्षकांची निवड करण्यासाठी राखीने तिच्या सोशल अकाउंट वरून एक फोन नंबर दिला आहे. या नंबरवर संपर्क केल्यानंतर योग्य प्रशिक्षकांची निवड करण्यात येईल असे आश्वासन राखीने दिले आहे. ज्या नवख्या कलाकारांना बॉलिवूड सृष्टीत येण्याची संधी हवी आहे त्या सर्वांसाठी राखीने दुबईत हे ऍक्टिंग क्लासेस सुरू केले आहेत. क्लासेसच्या माध्यमातून परदेशातील कलाकार सुद्धा बॉलिवूड सृष्टीत येऊ शकतील असे राखीचे म्हणणे आहे. राखी अनेकदा दुबई प्रवास करताना दिसली. याच कारणासाठी ती दुबईला जात होती अशी चर्चा आता सुरू आहे.