अशोक सराफ आणि निवेदिता जोशी हे मराठी सृष्टीतील प्रेक्षकांचं लाडकं जोडपं. या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेले आहे. घरच्यांचा विरोध पत्करून दोघांनी प्रेमविवाह केला होता. खरं तर निवेदिताचे वडील गजन जोशी उत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेते होते. मात्र वयाच्या अवघ्या चाळिशीतीच त्यांचे निधन झाले, त्यामुळे घरची जबाबदारी त्यांची पत्नी विमल जोशी यांनी चोख सांभाळली. आपल्या मुलीने अभिनय क्षेत्रातील मुलाशी लग्न करू नये हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे आई आणि बहीण मीनल आपल्या लग्नाला परवानगी देणार नाही हे निवेदिताला चांगलेच ठाऊक होते.
निवेदिताला त्यामुळे हे लग्न होण्यासाठी घरच्यांना पटवावे लागले होते. अर्थात यानंतर अशोक सराफ यांचे निवेदीताच्या घरी येणे जाणे चालू झाले. निवेदिता जोशी यांना लग्नाआधी स्वयंपाकातलं काहीच येत नव्हतं. सहज म्हणून त्यांनी अशोक सराफ यांच्यासाठी पोहे बनवले होते. अशोक सराफ पोहे खाऊन तिथून निघून गेले. निवेदिता यांच्या आई विमल जोशी या आकाशवाणीसाठी काम करत होत्या. आपले काम आटोपून त्या घरी आल्या. तेव्हा मिनलने पोहे बनवल्याचा किस्सा सांगितला सोबतच, आई तू अजिबात काळजी करू नको आता अशोक सराफ निवेदितासोबत लग्न करणं अजिबात शक्य नाही. कारण तिने इतके भयंकर पोहे बनवले होते की ते खाल्ल्यावर कुठलाही माणूस तिच्याशी लग्न करायला तयार होणार नाही.
अशोक सराफ यांना खाण्याची भयंकर आवड, त्यांना मासे इतके आवडायचे की ते दिवभर जरी दिले तरी रे तेवढ्याच आवडीने खायचे. मात्र निवेदिताला कसलाच स्वयंपाक येत नसल्याने लग्नानंतर त्यांना यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. अगदी मटकीला मोड कसे आणतात? हे देखील तिने आईला फोनवरून विचारले होते, तेव्हा आई त्यांच्यावर खूप चिडल्या होत्या. लग्नानंतर निवेदिता यांनी सगळा स्वयंपाक शिकून घेतला, यादरम्यान त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. आता त्या उत्तम स्वयंपाक बनवतात आणि लाखो चाहत्यांना युट्युब वर नवनवीन रेसिपीज बनवून दाखवतात. उत्कृष्ट शेफ म्हणूनही त्यांनी आता स्वतःची ओळख बनवली आहे. त्यांचा मुलगा अनिकेत सराफ हा सुद्धा व्यवसायाने शेफ आहे. आपल्या आई वडिलांचे अभिनयाचे गुण देखील त्याच्यात आहेत.